शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे किडनीचे नुकसान, लक्षणांकडे दुर्लक्ष नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:48 IST

शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. कोरोनातून बाहेर येण्यासाठी रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधींमुळे रक्तातील साखरेचे ...

शरीरातील अशुद्ध घटक लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. कोरोनातून बाहेर येण्यासाठी रुग्णाला दिल्या जाणाऱ्या औषधींमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे किडनीही पूर्ण क्षमतेने काम करत नाही. ज्यांना आधीपासून मधुमेहाचा त्रास आहे किंवा किडनीशी संबंधित आजार आहे अशी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास किडनीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ज्यांना पूर्वी किडनीचा कोणाताही त्रास नव्हता त्यांना हा त्रास सुरू झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी अनेकांची अवस्था होत आहे.

(बॉक्स)

किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास..

- किडनीचा आजार आधीपासून असणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाल्यास त्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

- किडनी व्यवस्थित काम करत आहे की नाही याची चाचणी (किडनी फंक्शन टेस्ट) वेळोवेळी करावी.

- पाणी भरपूर प्रमाणात, म्हणजे वेळोवेळी पीत राहावे. लघवी रोखून न धरता वेळीच लघवीला जावे.

- कोणतीही औषधी थेट आपल्या मनाने न घेता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(बॉक्स)

हे करा...

- दिवसातून अनेक वेळा पाणी पीत राहा. त्यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया चांगली राहते.

- आंबट पदार्थ जास्त खा, त्यामुळे व्हिटॅमिन सी मिळून इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

- नियमित व्यायाम, फिरणे आणि पुरेशी झोप घ्या. सतत एका ठिकाणी बसून राहू नका.

(बॉक्स)

हे करू नका

- ज्या औषधांनी किडनीवर परिणाम होतो ती औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.

- किडनी आणि मधुमेह हे आजार एकमेकांना पूरक असल्याने दोन्हीकडे दुर्लक्ष करू नका.

- किडनीच्या आजारग्रस्तांनी हिरव्या पालेभाज्या, मांसाहार असे प्रोटीनयुक्त अन्न टाळावे.

(बॉक्स)

स्टेरॉईड घेताय, डॉक्टरांना विचारले का?

- कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर किंवा कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्यानंतर मनाने औषधी घेणे धोक्याचे आहे.

- कोरोनाच्या उपचारात स्टेरॉईड दिले जाते, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य मात्रेनेच घेणे गरजेचे असते.

- स्टेरॉईडने मधुमेह वाढू शकतो आणि मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे सावधानता गरजेची आहे.

- स्टेरॉईड घेणे बंद करताना त्याचा डोस हळूहळू कमी करावा लागतो. अन्यथा त्याचे दुष्परिणाम दिसतात.

(कोट, बॉक्स)

नेफ्रॉलॉजिस्टच नाही

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून किडनीविकार तज्ज्ञच (नेफ्रॉलॉजिस्ट) नाही. हे पद रिक्त असल्यामुळे कोरोनाकाळात केल्या जात असलेल्या औषधोपचाराचा किडनीवर काय परिणाम होत आहे याची तपासणी करणे आरोग्य यंत्रणेसाठी कठीण काम झाले आहे.