शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खोब्रामेंढा तीर्थक्षेत्र दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:17 IST

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या खोब्रामेंढा तीर्थक्षेत्राचा विकास केल्यास या ठिकाणी भाविकांची संख्या वाढण्याबरोबरच पर्यटकांचीही संख्या वाढण्यास मदत होईल. मात्र हे ठिकाण दुर्लक्षित राहिले असल्याचे दिसून येते.मालेवाडापासून २० किमी अंतरावर खोब्रामेंढा हे तीर्थक्षेत्र आहे. डोंगराच्या अगदी पायथ्याशी हनुमानाचे मंदिर आहे. तिन्ही बाजुने डोंगर असल्याने येथील निसर्ग सौंदर्य ...

ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : महाशिवरात्रीनिमित्त भरते जत्रा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या खोब्रामेंढा तीर्थक्षेत्राचा विकास केल्यास या ठिकाणी भाविकांची संख्या वाढण्याबरोबरच पर्यटकांचीही संख्या वाढण्यास मदत होईल. मात्र हे ठिकाण दुर्लक्षित राहिले असल्याचे दिसून येते.मालेवाडापासून २० किमी अंतरावर खोब्रामेंढा हे तीर्थक्षेत्र आहे. डोंगराच्या अगदी पायथ्याशी हनुमानाचे मंदिर आहे. तिन्ही बाजुने डोंगर असल्याने येथील निसर्ग सौंदर्य अधिकच फुलून दिसते. त्याचबरोबर खोब्रामेंढा मंदिराजवळील डोंगरावर ट्रेकींगसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविल्यास या ठिकाणी पर्यटक व साहसी युवकांची संख्या वाढू शकते. मात्र या ठिकाणी वीज व्यवस्था वगळता इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. बदबदा ते खोब्रामेंढा या गावाच्या दरम्यान अर्धा किमी अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान आहे. अर्धा किमी अंतर केवळ पाऊलवाट आहे. पावसाळ्यात या ठिकाणी जाणे कठीण होते.खोब्रामेंढा येथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. मात्र या ठिकाणी वीज व एक विहीर वगळता इतर सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर तालुक्यातील काही मोजक्याच नागरिकांना माहित आहे. चार वर्षांपूर्वी या परिसरात नक्षल्यांची दहशत होती. त्यामुळे युवक मंदिराजवळच्या डोंगरावर चढत नव्हते. मात्र चार वर्षांपूर्वी जवळपास सात नक्षलवादी मंदिराजवळच मारल्या गेले. तेव्हापासून या ठिकाणची नक्षल्यांची दहशत कमी झाली आहे. आता अनेक युवक डोंगरावर चढून ट्रेकींगचा अनुभव घेत असल्याचे दिसून येते.