शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीत २० हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By admin | Updated: May 21, 2017 01:32 IST

हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार कृषी विभागाने खरिपाचे

कृषी विभागाची तयारी : ११ लाभार्थी गट लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार कृषी विभागाने खरिपाचे वाढीव नियोजन केले असून २०१७-१८ या खरीप हंगामात १९ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. शेतकऱ्यांना समतोल खत नियोजन, एकात्मिक खत व्यवस्थापनाचे नियोजन तसेच रासायनिक खतावरील अवाजवी खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने सन २०१६-१७ या वर्षात आरमोरी तालुक्यात एकूण ३ हजार ४४० मातीचे नमूने तपासले. १०० पेक्षा अधिक जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण २५ मे ते ८ जून या कालावधीत केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत चालू वर्षात पीक पद्धतीवर आधारित प्रत्येक १० हेक्टर प्रमाणे २५ लाभार्थी शेतकऱ्यांचा गट तयार करण्यात आला आहे. असे एकूण ११ लाभार्थी गट तयार करण्याचे नियोजन झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत पीक पद्धती, शाश्वत शेती, आत्माअंतर्गत सेंद्रीय शेती, प्रमाणिकरण योजना आदींच्या प्रचारासाठी कृषी विभाग तयार झाला आहे. गाव पातळीवर या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पेरणीच्या दरम्यान कीटकनाशके, खत व बियाणे यांची टंचाई जाणवू नये यासाठी कृषी विभागाने विशेष नियोजन केले आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून कृषी केंद्रावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचीही माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.