शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

'खाकी'नं निभावलं रक्तापलीकडचं नातं, हेलिकॉप्टरनं पोहोचवलं एक पिशवी रक्त

By संजय तिपाले | Updated: September 11, 2024 14:00 IST

पुरामुळे अडला होता मार्ग: प्रसूती झालेल्या मातेसाठी सरसावले प्रशासन

गडचिरोली : अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवसीबहुल भामरागडचा संपर्क तुटलेला आहे. ८ सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती केली होती. मात्र, या मातेला रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत ११ सप्टेंबरला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोच करण्यात आली. पूरसंकटात आरोग्य विभागाची तत्परता व 'खाकी' वर्दीने दाखविलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

मंतोशी गजेंद्र चौधरी (२४,रा.आरेवाडा ता. भामरागड) असे महिलेचे नाव आहे. ८ सप्टेंबर रोजी तिला प्रसववेदना जाणवू लागल्या. मात्र, याचवेळी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. भामरागडचा संपर्क तुटला होता. मात्र, आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवत पुरातून वाट काढत तिला दवाखान्यात आणले.   राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी यासाठी डॉक्टरांची मदत केली. दरम्यान, ९ रोजी मंतोशीची सुरक्षित प्रसूती झाली. दरम्यान, मंतोशीचा  B-ve हा रक्तगट आहे. या रक्ताची एक पिशवी तिला चढविण्यात आली होती. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणखी एका रक्त पिशवीची गरज होती. पुराने रक्ताची पिशवी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पोहोचविणे कठीण झाले होते. एकीकडे पूर व दुसरीकडे खराब हवामान यामुळे हेलिकॉप्टरने रक्तपिशवी पोहाेचविण्यास अडचण येत होती. अखेर ११ रोजी आकाश निरभ्र होताच गडचिरोलीतून एक पिशवी रक्त घेऊन आरोग्य कर्मचारी भामरागडला रवाना झाले. यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलिस दलाचे हेलिकॉप्टर विनाविलंब उपलब्ध करुन दिले.  सध्या माता व बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

रक्ताची एकच पिशवी होती उपलब्धदरम्यान, B-ve रक्तगट दुर्मिळ  असून एकमेव रक्तपिशवी सध्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होती. मंतोशी चौधरी या मातेसाठी ही रक्तपिशवी पोहोच करण्यात आली. आरोग्य व पोलिस विभागाच्या समन्वयामुळे अतिदुर्गम भागात तत्परतेने वैद्यकीय सुविधा पुरविण्यात यश आले व मंतोशी चौधरीवरील धोका टळला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली