शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

काकड आरतीत दंगले भक्तगण

By admin | Updated: November 1, 2014 22:53 IST

जिल्हाभर काकड आरती मोठ्या भक्तिभावाने सकाळच्या सुमारास प्रत्येक गावात केली जात आहे. आरमोरी येथे राम मंदिर व अहेरी येथे विठ्ठल रूख्माई मंदिरात सदर परंपरा कायम आहे.

आरमोरी/अहेरी : जिल्हाभर काकड आरती मोठ्या भक्तिभावाने सकाळच्या सुमारास प्रत्येक गावात केली जात आहे. आरमोरी येथे राम मंदिर व अहेरी येथे विठ्ठल रूख्माई मंदिरात सदर परंपरा कायम आहे. काकड आरतीचा समारोप कार्तिक पौर्णिमेला होत असल्याने जिल्हाभर भाविक काकड आरतीत भक्तिमय झाले आहेत.आरमोरी येथील राम मंदिर व विठ्ठल मंदिर येथे १२५ वर्षांपासून काकड आरतीची परंपरा चालू आहे. कोजागिरी पौर्णिमानंतर अश्विन पौर्णिमापासून काकडआरतीला सुरवात होते. यावेळी टाळ, मृदंग, ढोलकीच्या भाविक नामस्मरणात मग्न होतात. त्यानंतर तीर्थप्रसाद देवून काकडआरतीची समाप्ती करतात, कार्तिकी पौर्णिमेला काकडआरतीचा शेवटचा दिवस असतो. यावेळी नदीत घटाचे विसर्जन करण्यात येते व गोपाल काला करून महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो. आरमोरी येथे काकड आरतीच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुभाष खोब्रागडे, विलास जुआरे , मुखरू चौके, मधुकर दहीकार, धाबे महाराज, शामराव दहीकार, अरुण बांते, महेंद्र दहीकार, दिनेश दहीकार, संदीप दहीकार, सतीश दहीकर, कमलाबाई हेमके, प्रिन्स भानारकर, गोपाल दहीकार यांनी १२५ वषार्ची काकडरतीची परंपरा कायम ठेवली आहे .अहेरी येथील श्री विठ्ठल रूख्माई मंदिरात मागील ३६ वर्षापासून काकड आरतीची परंपरा कायम आहे. ६ नोव्हेंबरला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १९७९ मध्ये सत्यनारायण नामेवार यांच्या नेतृत्वात नवयुवक मंडळातर्फे काकड आरतीची परंपरा सुरू करण्यात आली. दरवर्षी काकड आरतीची सुरूवात आश्विन शुद्ध पौर्णिमेला होते. यावर्षी श्री विवाह सोहळ्याच्या कंकणधारकाचा मान लंच्छना गद्देवार यांनी स्वीकारला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)