मनोबल उंचाविण्यास मदत : अहेरी पोलीस उपमुख्यालयात कार्यक्रम अहेरी : येथील पोलीस उपमुख्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यादरम्यान विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधून त्यांचे मनोबल उंचाविण्याचा प्रयत्न केला. अहेरी येथील कै. चलमद्दीवार शाळेच्या विद्यार्थिनींनी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ यांच्यासह उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व जवानांना राख्या बांधल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष जोशी, अजय देशपांडे, सुधाकर उमरगुंडावार, अभय भोयर, धनराज दुर्गे, गग्गुरी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ यांनी विद्यार्थिनींच्या या कार्याचे कौतुक केले. पोलीस जवान हा दिवस-रात्र देशाच्या रक्षणासाठी मेहनत करीत आहेत. आपला घर व नातेवाईकांपासून दूर राहून अनेक जवान देशाच्या सीमांचे रक्षण करीत आहेत. कुटुंबीयांची आठवण येत असतानाही ते आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. या जवानांचे रक्षाबंधनाच्या माध्यमातून मनोबल उंचाविण्यास फार मोठी मदत होणार आहे. अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहेत. शाळा प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे राखीसारखा पवित्र सण पोलीस जवानांना आनंदात साजरा करता आला. पोलीस जवानांना घरच्यांची कमतरता भासली नाही, असे प्रतिपादन केले. (तालुका प्रतिनिधी)
चिमुकल्यांनी बांधल्या जवानांना राख्या
By admin | Updated: August 19, 2016 00:58 IST