मागणी : सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाव्दारे साकडेअहेरी : अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक सेवकाला वेतनo्रेणीबाबत न्याय द्यावा, अशी मागणी व्ही.टी. दहागावकर, वामन मडावी, जावेद अली, रघुनाथ तलांडे यांनी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा बल्लारपूरचे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, २३ जुलै २00७ ते ३0 एप्रिल २0१२ पर्यंतच्या कालावधीत अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकाच्या ३२00 ते ४९00 या वेतनo्रेणीला मान्यता देण्यात आली. मात्र आदिवासी विकास विभागाच्या नागपूरच्या अप्पर आयुक्तांनी सदर मान्यता अनावधानाने प्रदान करण्यात आली असून दिलेली रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला आहे. २३ जुलै २00४ शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर व शिक्षण सेवकाचा कालावधी संपला. ३२00 ते ४९00 या वेतनo्रेणीवर डी. एड. होण्याच्या अटीवर दहागावकर, मडावी, गेडाम, कोडनालवार, व्ही. एस. कुळमेथे, ओंडरे, रामटेके, आत्राम या अप्रशिक्षित शिक्षकांना मान्यता देण्यात आली. सदर शिक्षक आता डी.टी.एड उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे या सर्व शिक्षकांना प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांची वेतनo्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव नागपूरच्या अप्पर आयुक्ताच्या कार्यालयात पाठविण्यात आला असता अप्पर आयुक्तांनी ३२00 ते ४९00 या वेतनo्रेणीवर पदाला देण्यात आलेली अनावधानाने झालेली आहे, अशी कबुली देऊन वेतनातील रक्कम टप्प्याटप्याने वसूल करण्याचा आदेश अप्पर आयुक्तांनी दिला आहे. या शिक्षकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आदिवासी विकास विभागाच्या अस्पष्ट धोरणामुळे अनेक अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांवर गेल्या अनेक दिवसांपासून अन्याय होत आहे. आदिवासी विकास विभाग, शालेय शिक्षण विभागाप्रमाणे शिक्षक हिताचे निर्णय घेत नसल्याचेही या अन्यायकारक शिक्षकांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊन अन्यायकारक शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे रघुनाथ तलांडे व अन्यायकारक शिक्षकांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अप्रशिक्षित शिक्षकांना न्याय द्या
By admin | Updated: June 9, 2014 23:39 IST