शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जोगीसाखराचा बंधारा कुचकामी

By admin | Updated: July 30, 2015 01:16 IST

जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील नाल्यावर लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले.

मोटार पळविली : सेक्शन पाईप लिक झाल्याने बंधाऱ्याचे पाणी मोटारपर्यंत पोहोचले नाहीजोगीसाखरा : जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागामार्फत आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील नाल्यावर लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले. मात्र त्या बंधाऱ्यावरील मोटार चोरट्यांनी लंपास केली आहे. तसेच तत्कालीन अभियंत्यांच्या सदोष कार्यपध्दतीमुळे शासनाची कोल्हापुरी बंधारे बांधण्याची योजना पूर्णत: फसली असल्याचे वास्तव उजेडात आले आहे. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचाई विभागाच्या वडसा यंत्रणेमार्फत सन १९९४-९५ मध्ये खासदार निधीतून जोगीसाखरा येथील नाल्यावर सिमेंट काँक्रीटचे कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. प्रत्येक बंधाऱ्याच्या माध्यमातून सभोवतालची २५ हेक्टर पेक्षा अधिक शेतजमीन बारमाही सिंचनाखाली आणून पाण्याची भूजल पातळी वाढविणे तसेच सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. दरम्यान जि.प. सिंचाईच्या वडसा उपविभागामार्फत बंधाऱ्यांच्या कामांमध्ये ५० फूट खोल विहीर खोदण्यात आली. त्यात इनवेल जॅकवेल त्यावर सात अश्वशक्तीच्या दोन मोटारी, पाणी पुरवठा टाकी, पाईपलाईन आदींचे काम करण्यात आले. मात्र सिंचाई विभागाच्या तत्कालीन अभियंत्याच्या सदोष कार्यप्रणालीमुळे इनवेल ते मोटारपर्यंत टाकण्यात आलेला सेक्शन पाईप लिक असल्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी मोटारपर्यंत कधीच पोहोचले नाही. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधाऱ्याचा एक थेंबही पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचला नाही. महिनाभरापूर्वी जोगीसाखरा येथील बंधाऱ्यातील जॅकवेलमध्ये सुरक्षित असलेल्या सात अश्वशक्तीच्या दोन मोटारी चोरीला गेल्या. (वार्ताहर)बंधाऱ्याचा शेतकऱ्याना कवडीचाही फायदा नाहीसततची नापिकी व दुष्काळामुळे जोगीसाखरा भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी, यासाठी जि.प.च्या लघु सिंचाई विभागामार्फत जोगीसाखरा येथील नाल्यावर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम करण्यात आले. मात्र सदर बांधकाम योग्यरित्या करण्यात न आल्याने तसेच सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या भागातील एकाही शेतकऱ्याला कोल्हापुरी बंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधेचा लाभ आजतागायत झाला नाही, हे विशेष.