शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

जत्रांमध्ये शिवभक्तांचा जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:47 IST

महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरात विविध ठिकाणी जत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारच्या रात्री पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.

ठळक मुद्देपावसातही भाविकांमध्ये उत्साह : मार्कंडादेव, अरततोंडी येथील मंदिरात मान्यवरांच्या हस्ते महापूजा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरात विविध ठिकाणी जत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारच्या रात्री पाऊस झाला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र याची तमा न बाळगता शिवभक्तांनी पुजेसाठी तसेच जत्रेचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जिल्हाभरातील जत्रांमध्ये शिवभक्तांचा जनसागर उलटला होता.मार्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त आठ दिवसांची जत्रा भरते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मंगळवारी पहाटे राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मुख्य पूजा करण्यात आली. गुरव समाजाच्या वतीने पंकज पांडे यांना सपत्नीत पुजेला बसविण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी सपत्नीक, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, त्यांचे पती मधुकर भांडेकर, बीजेपी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भारत खटी जयराम चलाख, जगन येलके, डॉ. कुसनाके, डॉ. पंदे, सदाशिव मडावी, महादेव मडावी, कोहचाडे, वैशाली म्हरस्कोल्हे, दीपिका म्हरस्कोल्हे, उषा सिडाम, उर्मिला येरचे, तहसीलदार अरूण येरचे, सरपंच उज्वला गायकवाड, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे, एसडीपीओ सागर कवडे, पीआय गोरख गायकवाड, पुरातत्व विभागाचे शिंदे, पचिने, मनोज हेजीब आदी उपस्थित होते.आदिवासी गोंडीयन धर्म पध्दती प्रमाणे महादेवाची पूजा करण्यात आली. सगणापूर-येनापूर इलाक्यातील ५० ग्रामसभांच्या वतीने संतोष मसराम यांनी पूजन केले. ३० भूमका सेवा संघाची सांधिनी ही महापूजा मंगळवारी पहाटे २.३० वाजता सुरूवात झाली. पहाटे ४ वाजता पूजा संपली. डॉ. कोडापे सपत्नीक, माजी उपसरपंच ललिता म्हरस्कोल्हे, सिताराम म्हरस्कोल्हे यांना पुजेचा सन्मान मिळाला. यंदा प्रथमच आदिवासी बांधवांनी महाशिवरात्री निमित्त मुख्य पूजा केली.शिवभक्तांच्या स्वागतासाठी सजली मार्कंडादेव नगरीमहाशिवरात्रीनिमित्त मार्कंडेश्वर मंदिर परिसरात विद्युत दिव्यांची रोशनाई लावण्यात आली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्यात येत आहे. विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. भाविकांना सूचना देण्यासाठी जत्रा परिसरात ५० ध्वनीक्षेपक लावले आहेत. मंगळवारी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी सुमारे एक किमी अंतराची रांग लागली होती. ड्रोन कॅमेराचा पहिल्यांदाच या ठिकाणी वापर करण्यात आला आहे.अरतोंडीच्या महादेवगडावर उसळली भाविकांची गर्दीदेसाईगंज : अरतोंडी येथील महादेवगडावर माजी सभापती परसराम टिकले यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. यावेळी पं.स. सदस्य वृंदा गजभिये, देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम, उपाध्यक्ष श्रीराम टाकरे, सचिव गणेश मातेरे, ग्रा.पं. सदस्य रमेश वाढई, शारदा बांगळकर, राजकुमार बांगळकर, हेमचंद्र ढोरे, रामजी मानकर, हिरालाल कानतोडे, सोमाजी बांडे, नरहरी पिलारे, रेवनाथ चव्हारे, कवडू मातेरे, पुराणिक गायकवाड आदी उपस्थित होते. या ठिकाणी भागवत सप्तहाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळली होती.