गडचिरोली : गडचिरोली या मागास जिल्ह्यातील जेप्रा येथील तुमदेव रामजी लेणगुरे या शेतकरी सुपूत्राने अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेऊन शेतकऱ्यांसाठी सोपा आणि स्वस्त पेरणी यंत्र तयार केले आहे. तयार केलेल्या या पेरणी यंत्राची नागपूरातही प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रशंसा झाली आहे. गडचिरोली तालुक्यातील जेप्रा येथील तुमदेव रामजी लेणगुरे या शेतकरीपुत्राने बियाणे पेरणीसाठी लागणाऱ्या यंत्राची निर्मिती केली. या यंत्राचे वैशिष्ट्ये म्हणजे हे यंत्र शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाची बचत करणारे हे यंत्र आहे. या यंत्राची मुंबई आयआयटीमध्ये झालेल्या ‘अशियाज लार्जेस्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी फेस्टिवल’ म्हणजे ‘टेक फेस्ट २०१५’ मध्ये निवड झालेल्या वीज यंत्रामध्ये समावेश होता. तुकदेव लेणगुरे हा सध्या नागपूर येथील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून त्याने शिक्षण पूर्ण केले असून इयत्ता नववीत असताना विज्ञान प्रदर्शनात त्याच्या प्रतिकृतीचा पहिला क्रमांक आला होता व राज्यस्तरासाठी त्याची निवड झाली होती. रमन विज्ञान केंद्र नागपूरमध्ये झालेल्या प्रदर्शनामध्ये त्याने आपले दोन प्रोजेक्टही सादर केले होते. त्यात ‘सीड सेविंग कार्ट’ व ‘टुथब्रश अरेजमेंट या यंत्राचा समावेश होता. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने तयार केलेल्या या यंत्राचे सध्या विदर्भात कौतुक होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जेप्राच्या तरूणाने तयार केले पेरणी यंत्र
By admin | Updated: May 16, 2015 01:57 IST