भामरागड : भामरागड पोलीस उपविभाग कार्यालयाच्या वतीने कुमरगुडा येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात कुमरगुडा, बेजूर, टेकला येथील २२ आदिवासी जोडपे विवाहबद्ध झाले. त्यांना पोलीस विभागाच्या वतीने कपडे व गृहोपयोगी साहित्य वितरित करून आशीर्वाद देण्यात आला.या जनजागरण मेळाव्याचे उद्घाटन अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी सेवक सब्बर मोगल बेग, भामरागडचे ठाणेदार नाईकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी जयराजन, प्रकल्प कार्यालयाचे लिपिक मते, कृषी अधिकारी राऊत, वंजा दुर्वा, पद्मावार, मुडमासर, आलम आदींसह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)पोलिसांनी पेलले आव्हानहा कार्यक्रम बेजूर येथे घेण्यात येणार होता. परंतु ऐन वेळी कुमरगुडा येथे आयोजन करण्यात आले. तो यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन नव्याने रूजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत यांच्या समोर होते. त्यांच्या मार्गदर्शनात नक्षल विरोधी अभियान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, महंगळे, खैरनार यांनी तसेच सीआरपीएफ जवांनांनी चोख बंदोबस्त लावून हा मेळावा यशस्वी केला.
कुमरगुडा येथे जनजागरण मेळावा : पोलीस प्रशासनातर्फे कपडे व गृहोपयोगी वस्तू वितरित
By admin | Updated: September 10, 2015 01:49 IST