महाप्रसाद वितरण : सीआरपीएफ ३७ बटालीयनचा पुढाकारअहेरी : येथील प्राणहिता सीआरपीएफ कॅम्पमध्ये विश्वकर्मा पूजा शनिवारी करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सीआरपीएफ ३७ बटालीयनचे द्वितीय कमांडंट जितेंद्रकुमार यांच्या हस्ते होमहवन करून आरती करण्यात आली. सकाळी सुरू झालेल्या विश्वकर्मा पूजेला कॅम्पमधील सर्व जवान उपस्थित होते. त्यानंतर सर्व जवानांनी पूजा केली. पूजा झाल्यानंतर सर्व जवानांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी उपकमांडंट बी. के. शर्मा, एल. एम. जी. शर्मा उपस्थित होते. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांपासून कॅम्पमध्ये सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होमहवन, पूजा केली जात आहे. या माध्यमातून कॅम्पमध्ये धार्मिक सलोखा राखण्याचे काम होत आहे. सर्व जवान एकत्र मिळून विधी पार पाडत असल्याने सीआरपीएफ कॅम्पमध्ये शांतता टिकून राहत आहे. यंदा उत्साहात विश्वकर्मा पूजा करण्यात आली.
जवानांनी केली विश्वकर्मा पूजा
By admin | Updated: September 19, 2016 02:04 IST