शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आयटक संघटनेच्यावतीने गडचिरोलीत जेलभरो

By admin | Updated: August 10, 2016 01:37 IST

आयटक संघटनेच्या वतीने असंघटीत कामगार, शेतकरी, हातपंप देखभाल व दुरूस्ती कामगार तसेच अंगणवाडी महिला कर्मचारी...

शेकडोंची उपस्थिती : अंगणवाडी महिला व हातपंप दुरूस्ती कामगार सहभागी गडचिरोली : आयटक संघटनेच्या वतीने असंघटीत कामगार, शेतकरी, हातपंप देखभाल व दुरूस्ती कामगार तसेच अंगणवाडी महिला कर्मचारी यांच्या विविध मागण्यांना घेऊन मंगळवारी क्रांतीदिनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व हातपंप देखभाल दुरूस्ती व कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेश कोपुलवार, कार्याध्यक्ष अ‍ॅड. जगदिश मेश्राम, माजी जि.प. सदस्य अमोल मारकवार, आयटकचे अध्यक्ष देवराव चवळे, जलीलखॉ पठाण, विनोद झोडगे, चंद्रभान मेश्राम, प्रकाश ठलाल आदींनी केले. यावेळी आंदोलनाकांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात मागील दोन वर्षात आपण सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासन पूर्ण झाली नाही. जुन्या काँग्रेस प्रणित आघाडी सरकारच्या काळात असलेल्या धोरणांचीच दुप्पट गतीने अंमलबजावणी केली जात आहे, असा आरोप आयटकने केला आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढत असून ती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, रोजगार निर्माणासाठी पाऊल उचलण्यात यावे, कायम बारमाही कामाचे कंत्राटीकरण बंद करावे, कंत्राटी कामगारांना कायम कामगाराचे वेतन, सेवा शर्ती लागू करण्यात याव्या आदीसह १२ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच हातपंप देखभाल दुरूस्ती कामगार संघटनेच्या वतीनेही हातपंप देखभाल व दुरूस्ती कामगारांना जि.प.मध्ये शासकीय सेवेत सामावून घ्यावे, बेकायदेशीर अटी व शर्तीवर आधारीत करारनामा रद्द करण्यात यावा, वाढत्या महागाईनुसार २० ते २२ हजार रूपये मानधन देण्यात यावे, जे कामगार वयोवृध्द आहेत, अशा कुटुंबातील एक सदस्य जि.प.मध्ये कामगार म्हणून घेण्यात यावा, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हातपंप देखभाल व दुरूस्ती कामगारांना रजा लागू करण्यात यावी, जिल्ह्यात रिक्त असलेल्या यांत्रिकी व मदतनिस पदावर ट्रायसेम यांत्रिकांना प्राधान्य देऊन पदभरती करण्यात यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे हातपंप कामगारांनासुध्दा १५ टक्के नक्षल प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाला जिल्हाभरातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)