शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

विज्ञानाची कास धरूनच कलामांचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार

By admin | Updated: August 9, 2015 01:26 IST

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न बघितले होते.

खासदारांचे प्रतिपादन : गडचिरोलीत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटनगडचिरोली : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी २०२० पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला विज्ञानाची कास धरून प्रत्येक क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. स्थानिक शिवाजी कला महाविद्यालयात इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जि.प. सीईओ संपदा मेहता, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदुरकर, प्रशांत वाघरे, प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, निरंतर शिक्षणाधिकारी निलेश पाटील, चामोर्शी पं.स.च्या सभापती शशीकला चिळंगे, प्राचार्य एम. जे. मेश्राम, भारत खटी, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. यावेळी आ. गजबे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण करण्याचे आवाहन केले. डॉ. देवराव होळी यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी आत्राम, संचालन राकेश चडगुलवार तर आभार निलेश पाटील यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)