शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि ...

ठळक मुद्देकाँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे : सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी येथे केला.सामाजिक परिवर्तन अभियानाच्या चौथ्या टप्प्यात मंगळवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. गेल्या काही वर्षात काँग्रेसचा पारंपरिक मतदार काही प्रमाणात काँग्रेसपासून दूर जाऊन विविध पक्षात विखुरला गेला. त्यांना परत काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्यासाठी राज्यभर सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत १९ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून आता चौथा टप्पा सुरू झाल्याचे डॉ.वाघमारे यांनी सांगितले.केंद्र व राज्य सरकारने २०१४ पासून मागासवर्गीयांच्या ३५६ योजना बंद केल्या आहेत. पण सत्तेला चिकटून बसलेले पक्ष त्यावर तोंडातू ब्र काढत नाहीत. समाजककल्याणच्या निधीमधून ३५०० कोटी शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी वळते केले. पण ना कर्जमाफी व्यवस्थितपणे दिली, ना मागासवर्गीयांना योजनांचा लाभ दिला. तरीही रामदास आठवले बोलत नसतील तर ते मागासवर्गियांच्या काय कामाचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.रुग्णांचे प्राण वाचविणाºया डॉक्टरांचेच प्राण घेण्याच्या गोष्टी करणारे हंसराज अहीर असो की कर्नाटकमध्ये जाती-धर्माच्या आधारेच माणसांची ओळख असावी, असे म्हणणारे केंद्रीय मंत्री असो, या विधानांवरून भाजप सरकार मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. या पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.सरकारी शाळा बंद करण्याचा घाटसरकारी शाळांमध्ये मागासवर्गिय, आर्थिक कमकुवत मुले शिकतात. पण त्याच शाळा बंद करण्याचा घाट रचून सरकार मागासवर्गियांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. सुटाबुटातल्या सरकारला याचे भान नाही. त्यामुळे मागासवर्गिय समाजाला भानावर आणण्यासाठी आम्ही हे समाजिक परिवर्तन अभियान राबवत असल्याचे डॉ.राजू वाघमारे म्हणाले.