शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

चिखलातून गाठावे लागते येडसिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:56 IST

झिंगानूरपासून सात किमी अंतरावर असलेल्या येडसिली गावाला जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून दुचाकी तर सोडाच बैलबंडी किंवा पायदळ जाणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्दे२५ वर्षांपासून दुरूस्ती रखडली : बैलबंडी किंवा सायकल नेणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : झिंगानूरपासून सात किमी अंतरावर असलेल्या येडसिली गावाला जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून दुचाकी तर सोडाच बैलबंडी किंवा पायदळ जाणेही कठीण झाले आहे.येडसिली हे गाव झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत येते. येडसिली येथे कोणत्याही सुविधा नसल्याने प्रत्येक कामासाठी येथील नागरिकांना झिंगानूर येथेच यावे लागते. झिंगानूर ते येडसिली दरम्यानचा रस्ता जंगलातून जाते. रस्त्याची अवस्था बघितली तर त्याला रस्ता न म्हणता जंगलातील पायवाट असेच संबोधणे योग्य ठरेल, अशी बिकट अवस्था या रस्त्याची झाली आहे.झिंगानूर ते येडसिली दरम्यानच्या रस्त्यावर खोलगट भाग आहे. या ठिकाणी जंगलातील पाणी जमा होत असून प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. पायदळ व्यक्ती बाजूने जंगलातून जातात. मात्र सायकलस्वार किंवा इतर बैलबंडीला या चिखलातून मार्गक्रमण केल्याशिवाय पर्याय राहत नाही. या गावातील व्यक्ती आजारी पडल्यास झिंगानूर येथे आणावे लागते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने सात किमी अंतर खाटेवर बसवून आणल्याशिवाय पर्याय नाही. मार्ग दुरूस्तीबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. रस्त्यांअभावी रुग्ण, गरोदर माता, नवजात बालक यांचा गावातच मृत्यूू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शासनाने रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष घालणे आवश्यक आहे.१९८३ मध्ये सुरू होती बसपेंटारामा तलांडी हे आमदार असताना सन १९८२-८३ मध्ये सिरोंचा-आसरअल्ली-कोपेला-झिंगानूर-येडसिली-कल्लेड-देचलीपेठा या मार्गाने बस सुरू होती. याचा अर्थ त्या कालावधीत रस्त्यांची अवस्था चांगली होती. हे स्पष्ट होत आहे. आता मात्र याच रस्त्यांवरून बैलबंडी किंवा सायकलसुद्धा नेणे कठीण झाले आहे. अनेक वर्ष रस्ते दुरूस्ती न झाल्याने ही अवस्था झाली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली