शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत काँग्रेसला बसलेला फटका भरून काढणे अशक्य

By admin | Updated: June 14, 2014 23:33 IST

लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला ७० हजार मतांचा फटका बसला आहे. आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रातही ४२-४३ हजाराचा फटका बसला आहे. काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य भरून काढू शकत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जागा लढविल्यास लोकसभेत बसलेल्या फटक्यातून सावरण्याची ताकद राकाँत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी झाले आहे. ओबीसींच्या प्रश्नावर राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले. याचा फटका विदर्भात काँग्रेस-राकाँ आघाडीला बसला. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे, अशी मागणी आपण राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शासनाने विधानसभेत घोषणा केल्यानंतरही आदिवासी विकास महामंडळाचे खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. ते सुरू करण्यात यावे, व्यापारीच मालाची खरेदी करीत आहे, असे ते म्हणाले. मोदी लाटेमुळे निवडणुकीत देशभरात संपुआचा पराभव झाला असला तरी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात विविध कारणामुळे आम्ही मतदारांपर्यंत पोहोचू शकलो नाही. काँगे्रसला या निवडणुकीत जबर फटका या मतदार संघात बसला. विधानसभेतही ही परिस्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व आरमोरी हे तीनही विधानसभा मतदार संघ राकाँकडे द्यावेत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही परिस्थिती सुधारू शकते, ऐवढी ताकद आमच्यामध्ये आहे, असा दावाही त्यांनी केला. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झालेत, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेले एटापल्ली पं.स.चे माजी उपसभापती घिसू मट्टामी, राकाँ नेते बापू तलांडी व ज्येष्ठ गांधीवादी उद्धवराव ताकसांडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, असा ठरावही पारित करण्यात आला, अशी माहिती धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुरेश पोरेड्डीवार, प्रकाश ताकसांडे, प्राचार्य खुशाल वाघरे, महिला राकाँ अध्यक्ष पुष्पा अलोणे, कार्यकारी अध्यक्ष जमीर हकीम, श्रीनिवास गोडसेलवार, अरूण हरडे, जयंत येलमुले आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)