शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीदरम्यान सकारात्मक संवाद करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:23 IST

संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा.

ठळक मुद्देदातृत्वाची भावना जागृत करणारा सण

संक्रांतीनिमित्त महिला एकत्र येतात. यामुळे संवाद घडून येतो. संवाद हा संवेदनशील, अहिंसक, शक्ती जागृत करणारा व ऊर्जा देणारा असावा. आपल्यामध्ये एखादी व्यक्ती नाही, म्हणून तिची चुगली करणे, अशा प्रकारचा नकारात्मक संवाद न करता सकारात्मक संवाद करावा. संवाद हे जगातील सर्वात महत्त्वाचे चलन आहे. पैशाने व्यवहार होतो. मात्र संवादाने तो घडून येतो. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना व्यक्त होता येते, नाती जपण्याचे कौशल्य प्राप्त होते. भावनांना मोकळी वाट करून देता येत असल्याने मन स्वच्छ व निर्मळ राहण्यास मदत होते. संवादाने संवेदनशील मनांचे मिलन होते. महिलांमध्ये ऊर्जा, प्रेम, सहनशिलता, सृजनशिलता अशा अनेक गोष्टी दडल्या आहेत. या सर्व गोष्टींचा उपयोग विधायक कामांसाठी होऊ शकतो. स्त्रीमध्ये मातृत्व व दातृत्व राहते. वाणाच्या निमित्ताने दातृत्वाची भावना प्रकर्षाने जागृत होते. प्रत्येकाने प्रेमाने बोलले पाहिजे. समाजात क्रांती, बदल संवादाच्या माध्यमातून होऊ शकते. प्रेम हे जगण्याचे तत्व आहे. प्रेमळ संवादाचा कुटुंब व समाजाला फायदा होतो. मनातील गैरसमज, राग, द्वेष आणि त्यातून उद्भवणारा वाद टाळायचा असेल तर संवाद गरजेचा आहे. संवादाने माणूस खुलतो, फुलतो आणि आनंदी होतो. यामुळे संपूर्ण जग आनंदी राहते, एवढी ताकद संवादामध्ये आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. संवादाच्या माध्यमातून विचारांचे संघटन होते. जिच्याकडे पण..‘ती’ म्हणून पाहिले जाते, संवादाच्या माध्यमातून ती काळोख दूर करणारी पणती निर्माण होऊ शकते.सविता सादमवारमुख्याध्यापिका, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट तथा जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष, संचालिका, पणती संस्था