शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी जिल्ह्याचा मुद्दा विधानसभेत

By admin | Updated: June 14, 2014 23:34 IST

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्मितीस राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न जोर धरू लागला असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक आत्राम

औचित्याचा मुद्दा : दीपक आत्राम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीगडचिरोली : ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्मितीस राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न जोर धरू लागला असून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक आत्राम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडेही जिल्हा निर्मितीची मागणी रेटून धरली आहे.गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर-दक्षिण विस्तार जवळपास ३५० किमी आहे. भामरागड व सिरोंचा हे तालुके गडचिरोली मुख्यालयापासून सुमारे २५० किमी अंतरावर आहेत. जिल्हास्थळी एखाद्या प्रशासकीय कामासाठी आलेल्या नागरिकाला त्याच दिवशी परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. एक दिवस येण्यासाठी, दुसरा दिवस प्रशासकीय काम करण्यासाठी व तिसरा दिवस परत जाण्यासाठी लागत असल्याने नागरिकांना बराच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ तालुके असून अहेरी परिसरात ५ तालुके सध्या कार्यरत आहेत. अहेरी परिसराचा ९० टक्के भूभाग दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. तालुक्यांचा आकार मोठा असल्याने ७० ते ८० किमीचे अंतर तुडवून नागरिकांना तालुकास्थळी यावे लागते. त्यामुळे बहुतांश नागरिक तालुकास्थळी येतच नाही व शासकीय योजनांचा लाभही घेत नाही. परिणामी सदर नागरिकांचा आर्थिक विकास थांबला आहे. या बाबीचा विचार करून आणखी सहा तालुके निर्माण करण्यात यावे व अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी आहे. विस्तीर्ण भूभागाचा विचार करून पोलीस विभागाने अहेरी पोलीस जिल्ह्याची निर्मिती केली आहे. अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात अतिरिक्त पोलीस दर्जाचे अधिकारीही देण्यात आले आहे. त्याच धरतीवर अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांकडून आंदोलन छेडून अहेरी जिल्ह्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे शासनाचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. राज्य मंत्रीमंडळाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा निर्माण केला आहे. त्यानंतर अहेरी जिल्ह्याची मागणी जोर धरू लागली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक आत्राम यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या मागणीकडे लक्ष वेधले आहे. या संदर्भात आ. आत्राम यांनी मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेटूनही चर्चा केली व अहेरी जिल्ह्याला न्याय द्या, अशी मागणी केली. (नगर प्रतिनिधी)