शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विभागाच्या अभियंत्याने घेतली आठ हजारांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:36 IST

सिंचन विहीरीचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी ८ हजारांची लाच घेणा-या देसाईगंज येथील शाखा अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले.

गडचिरोली : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला विहीर’ योजनेअंतर्गत मंजुरी मिळाल्यानुसार एका शेतकºयाने आपल्या शेतात बांधलेल्या सिंचन विहीरीचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी ८ हजारांची लाच घेणा-या देसाईगंज येथील शाखा अभियंत्याला रंगेहात पकडण्यात आले. हरी आत्माराम गोन्नाडे असे त्या अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सिंचन विहीर योजनेनुसार शेतकºयांना विहीर बांधकामासाठी अनुदान दिले जाते. शेतकºयाने आधी स्वत: खर्च लावून विहीर बांधायची आणि नंतर त्याचे बिल सादर करायचे असते. त्यानुसार जिल्हा परिषद सिंचन विभागाचे देसाईगंज येथील शाखा अभियंता हरी गोन्नाडे यांच्या कार्यालयात तक्रारकर्त्या शेतकºयाने विहिरीचे बिल सादर केले. मात्र ते बिल मंजूर करण्यासाठी त्याला ८ हजार रुपयांची मागणी झाली. या शेतकºयाने गडचिरोलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार सादर केली. त्यानुसार सोमवारी सापळा रचण्यात आला. त्यात ८ हजार रुपये लाचेची मागणी करून ती साक्षीदारांसमक्ष स्वीकारताना अभियंता गोन्नाडेला रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई देसाईगंज येथील जि.प.सिंचन उपविभाग कार्यालयात  सोमवारी दुपारी करण्यात आली.एसीबीचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पो.निरीक्षक एम.एस.टेकाम, सहा.फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार सत्यम लोहंबरे, ना.पो.शिपाई रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, महेश कुकुडवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.