शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लोहखनिज उद्योग रखडलेलेच

By admin | Updated: August 9, 2014 23:42 IST

गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यात लोहखनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. या खनिजाच्या भरवशावर येथे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने अनेक उद्योजकांना लिज प्रदान केली होती.

नक्षलग्रस्त भाग : मायनिंग कंपनीच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा परिणामगडचिरोली : गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यात लोहखनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. या खनिजाच्या भरवशावर येथे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने अनेक उद्योजकांना लिज प्रदान केली होती. मात्र नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे ८ ते १० वर्षाचा कालावधी लोटूनही येथे उद्योग सुरू होऊ शकले नाही. गतवर्षी मायनिंग कंपनीच्या एका उपाध्यक्षाची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याने आता येथून लिज घेतलेल्या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळलेला आहे. त्यामुळे येथे मायनिंग उद्योग येण्याची आशा पूर्णत: मावळली आहे. जिल्ह्यात लोहखनिज, सिमेंट याचे साठे मोठ्या प्रमाणावर असल्याने २००८ नंतर जिल्ह्यात मायनिंग उद्योगाला चालना देण्यासाठी काही खाजगी उद्योगांना लिज देण्यात आली. यामध्ये लॉयड्स मेटल अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग कंपनीला ३४८.९ हेक्टर, गोपानी आयर्न अ‍ॅन्ड पॉवर कंपनीला १५३.०९ हेक्टर, इस्पात इंडस्ट्रीजला २०५० हेक्टर, गोपानी आयर्न अ‍ॅन्ड पॉवर कंपनीला एटापल्ली तालुक्यात धमकोंडावाडी येथे २९५ हेक्टर जागा लीजवर देण्यात आली आहे. तर अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे वायएमएस कंपनी २५२ हेक्टर, गुजरात अंबुजा सीमेंट २७१ हेक्टर, सनप्लॅग आयर्न अ‍ॅन्ड स्टील कंपनीला बांडे गावाजवळ २३६.७५ हेक्टर, कोरची तालुक्यातील मसेली गावाजवळ सुरजागड स्टील अ‍ॅन्ड माईन्स कंपनीला ५० हेक्टर जागेवर लीज देण्यात आली होती. काही उद्योगाला गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीत भुखंड देण्यात आले होते. मात्र त्यांनी विहित कालावधीत उद्योग सुरू न केल्याने त्यांचे भुखंड आरक्षण रद्द करून ही जागा आता पोलीस प्रशासनाच्या हवाईपट्टीसाठी शासनाने प्रदान केली आहे. तर ज्या उद्योजकांनी एटापल्ली तालुक्यात उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या एका अधिकाऱ्याची व उपाध्यक्षाची हत्या झाल्याने त्यांनीही त्यानंतर हा प्रयत्न सोडून दिला, अशी माहिती आहे. एकूणच मोठी खनिज संपत्ती असतानाही येथे खनिजावर आधारित उद्योग केवळ माओवाद्यांच्या विरोधामुळे रखडलेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)