शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

सुरजागडची लोहखाण उठतेय सामान्य कामगारांच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

२६ फेब्रुवारीला ज्या युवकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली त्या युवकाच्या पत्नीनेही या हत्येसाठी लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी मायनिंग कंपनीला जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कंपनीने या हत्येचा मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे. एटापल्ली तालुक्यातील मगुंठा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी अशोक रामू कोरसामी या आदिवासी युवकाची भर कार्यक्रमातून नेऊन नक्षलवाद्यांनी हत्या केली होती.

ठळक मुद्देनक्षलवाद्यांचा रोष; हत्या झालेल्या युवकाच्या पत्नीचा लॉयड्स आणि त्रिवेणी कंपनीवर ठपका

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याला औद्योगिक विकासाच्या नकाशावर आणत विकासाचे स्वप्न दाखवणारी सुरजागड लोहखाण आणि लॉयड्स मेटल्सचा कोनसरीतील स्टिल प्लान्ट अजूनही अधांतरीच आहे. आता पुन्हा लोहखाणीचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना त्यासाठी सहकार्य करणारे सामान्य लोक नक्षलवाद्यांच्या रडारवर आले आहेत. २६ फेब्रुवारीला ज्या युवकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली त्या युवकाच्या पत्नीनेही या हत्येसाठी लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी मायनिंग कंपनीला जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कंपनीने या हत्येचा मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.एटापल्ली तालुक्यातील मगुंठा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी अशोक रामू कोरसामी या आदिवासी युवकाची भर कार्यक्रमातून नेऊन नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी ते नक्षलवादी कंपनीसाठी (लोहखाण) काम करत असल्याबद्दल त्याला बोलत होते.सुरजागड प्रकल्प नव्याने सुरू होत असल्याचे सांगत लॉयड मेटल्स व त्रिवेणी मायनिंग कंपनीने या कामासाठी माणसे मिळवून देण्यास आपल्या पतीला सांगितले होते. त्यामुळे तो चार महिन्यांपासून गावागावात जाऊन युवकांची कागदपत्रे गोळा करून देत होता. याला नक्षलवाद्यांचा विरोध असल्याने त्याचा राग मनात ठेवून नक्षलवाद्यांनी त्याला मारल्याचे मृतक अशोकची पत्नी बेबी हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे नागरिक काहिसे दहशतीत आहेत.

पोलीस सुरक्षेच्या भाड्याचे कोट्यवधी थकीत?दोन वर्षांपूर्वी सदर लोहखाणीतून कच्चा माल काढताना आणि तो लॉयड मेटल्सच्या घुग्गुस येथील कारखान्यात नेताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविला जात होता. त्याच्या भाड्यापोटी पोलीस विभागाची ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम कंपनीकडे थकीत आहे. ते पैसे अजूनही कंपनीने भरलेले नसताना आता पुन्हा विनामोबदला सदर कंपनीला पोलीस संरक्षण मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोनसरीचा प्रकल्प अधांतरीचसुरजागडच्या लोहखाणीला जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारणीच्या अटीवरच लीज मंजूर केली होती. त्यासाठी कोनसरी येथे साडेतीन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रस्तावित प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. पण नंतर लोहदगडांची वाहतूक सुरूच राहूनही प्रकल्पाच्या उभारणीत कोणतीही प्रगती झाली नाही. यावरून हा प्रकल्प खरोखरच गडचिरोली जिल्ह्यात होणार की नाही, यावरही आता प्रश्नचिन्ह लागले आहे.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस