शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कल्याण समितीने केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:03 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने शनिवारी आरमोरी तालुक्याचा दौरा केला. देऊळगाव, ठाणेगाव व आरमोरी येथील विविध ठिकाणी भेटी देऊन सोईसुविधांची पाहणी केली.

ठळक मुद्देशासकीय सोईसुविधा तपासल्या : नागरिकांशी संवाद साधून विविध बाबींची घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने शनिवारी आरमोरी तालुक्याचा दौरा केला. देऊळगाव, ठाणेगाव व आरमोरी येथील विविध ठिकाणी भेटी देऊन सोईसुविधांची पाहणी केली. उपस्थित अधिकारी व कर्मचाºयांकडून विविध बाबींची माहिती जाणून घेतली.अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके, समितीचे सदस्य आमदार प्रभूदास भिलावेकर, आमदार संजय पुराम, आमदार पास्कल धनारे, आमदार डॉ. संतोष टारफे यांनी देऊळगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकाला भेट दिली. येथील सोयीसुविधांची पाहणी करून निवासस्थान दुरूस्तीचे काम न्याहाळले. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाची पाहणी करून लाभार्थ्यांची चर्चा केली. ठाणेगाव येथे भेट देऊन ३०५४ योजनेंतर्गत आदिवासी उपयोजनामधून ठाणेगाव-ठाणेगाव टोली या रस्ता दुरूस्तीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर समितीने आरमोरी येथील प्रिती माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन तेथील सोयीसुविधा, भोजन व्यवस्था व परिसराची पाहणी केली. आश्रमशाळेतील कर्मचारी पदभरतीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. येथील भोजन व्यवस्थेची पाहणी केली. उपस्थित असलेल्या रूग्णांशी चर्चा केली. शस्त्रक्रिया गृहालाही भेट देऊन पाहणी केली. येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट दिली.नागरिकांनी वाचला रूग्णालयातील समस्यांचा पाढाआरमोरी उपजिल्हा रूग्णालयाला अनुसूचित जमाती कल्याण समितीने भेट दिल्यानंतर येथील अनेक नागरिकांनी समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्षांसमोर रूग्णालयातील विविध गैरसोयी व इतर समस्यांचा पाढा वाचला. रिक्त पदांमुळे या रूग्णालयाच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांनी समितीच्या सदस्यांना सांगितले. येथील डॉक्टर रूग्णांना परिपूर्ण व योग्य सेवा देत नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली. येथील समस्या सोडविण्याची मागणी केली.वडसात वसतिगृह व इतर कामांची पाहणीदेसाईगंजात दाखल झालेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी तालुक्यातील शासकीय वसतिगृह व विविध कामांची प्रत्यक्ष मोका चौकशी करून पाहणी केली. दरम्यान समितीने तालुक्यातील कुरूड येथे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ठाकूर तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची पाहणी व चौकशी केली.देसाईगंजपासून तीन किमी अंतरावर असलेल्या गोकुलनगर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. देसाईगंज येथील नामांकित विद्यालयाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगरसेवक राजू जेठाणी आदी उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.