शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दुर्बिण दगड हलविल्याचे चौकशीत निष्पन्न

By admin | Updated: July 13, 2015 01:53 IST

तालुक्यातील पालोरा येथील बन्सोड यांच्या जमिनीचे मोजमाप करून देताना भूकरमापक जाधव यांनी दुर्बिण दगड दुसऱ्या जागेवर हलविला असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.

आंदोलनाचा इशारा : भूकरमापकावर कारवाई कराआरमोरी : तालुक्यातील पालोरा येथील बन्सोड यांच्या जमिनीचे मोजमाप करून देताना भूकरमापक जाधव यांनी दुर्बिण दगड दुसऱ्या जागेवर हलविला असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जाधव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पालोरा येथील शेतकरी बन्सोड यांनी भूमापक कार्यालयाकडे केलेल्या अर्जानुसार भूकरमापक जाधव यांनी २३ फेब्रुवारी २०१५ रोजी मोजणी करून दिली. मात्र लगतचे शेतकरी तान्हाजी चिलबुले, नत्थू जिभकाटे, प्रल्हाद मेश्राम, शीलाबाई चिलबुले, थूलकन्या मेश्राम यांना याबाबत कोणतेही नोटीस दिले नाही. त्याचबरोबर दुर्बिण दगड ५० मिटरने सरकवून लगतधारक कास्तरांची संपूर्ण जागा बन्सोड यांना मोजून दिली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. आदेशानुसार भूमीअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांच्या मार्फत २४ जून रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन चौकशी करण्यात आली. यावेळी तलाठी नकाशानुसार सर्वे क्र. १३७ मध्ये शेतात नमूद असलेला दुर्बिण दगड सर्वे क्र. १३९ च्या शेतात असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार भूकरमापक जाधव यांनी जाणुनबुजून केला आहे. जमीन मापनानंतर बन्सोड व इतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाद निर्माण झाले होते. जाधव यांनी हे कृत्य आर्थिक लाभापोटी केले असल्याचा आरोप लगतधारक शेतकऱ्यांनी केला आहे. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून तान्हाजी चिलबुले, नत्थू जिभकाटे, प्रल्हाद मेश्राम, शीला चिलबुले, थूलकन्या मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जाधव यांनी यापूर्वी केलेल्या इतरही जमिनींच्या सर्वेक्षणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)