शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सागवानची अवैध तोड

By admin | Updated: November 13, 2016 02:06 IST

आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा नजीक असलेल्या सावलखेडा व पळसगाव जंगलात सागवान वृक्षाची

लाखो रूपयांचे नुकसान : सावलखेडा, पळसगाव जंगलातील प्रकारजोगीसाखरा : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा नजीक असलेल्या सावलखेडा व पळसगाव जंगलात सागवान वृक्षाची अवैधरित्या मोठ्या प्रमाणात तोड सुरू असून यामध्ये लाखो रूपयांची वनसंपत्ती नष्ट होत आहे. मात्र याकडे वन विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत पळसगाव उपक्षेत्रातील सावलखेडा कक्ष क्रमांक ३१ व पळसगाव वनकक्ष क्रमांक ८२२ मध्ये शेकडो हेक्टर जमिनीवर सागवानाचे महागडे व इमारती लाकडाचे जंगल आहे. पळसगाव येथील संबंधित वनरक्षक मुख्यालयी असलेल्या आपल्या शासकीय निवासस्थानाला कुलूप लावून आरमोरी तालुका मुख्यालयी वास्तव्य करतात. सदर वनरक्षकाकडे दोन बिटाचा कारभार सोपविण्यात आला असला तरी एकाही बिटातील वनसंरक्षणाची जबाबदारी नीट सांभाळताना सदर वनरक्षक दिसून येत नाही. प्रत्यक्ष जंगलात न जाता वन परिक्षेत्र कार्यालयातूनच वनांचे संरक्षण केले जात असल्याने वनतस्कर मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाचा फायदा घेत वनतस्कर महागड्या सागवानची मोठ्या प्रमाणात खुलेआम कत्तल करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सावलखेडा व पळसगावच्या जंगल परिसरात वनतस्करी प्रचंड वाढली आहे. संबंधित वन परिक्षेत्राधिकारी आपल्या अधिनस्त वन कर्मचाऱ्यावरील नियंत्रण सैल केल्याने वनरक्षक व इतर कर्मचारी याचा फायदा घेत आहेत. परिणामी कोट्यवधी रूपयाचे सागवान वन तोडले जात असल्याने शासकीय महसूल बुडत आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी अद्यापही सुस्त आहेत. या संदर्भात आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांच्याकडे विचारणा केली असता, ते उपविभागीय वनाधिकारी कार्यालयात बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)अहवाल निरंकसावलखेडा व पळसगाव या दोन्ही बिटाचा कारभार एकाच वनरक्षकाकडे सोपविण्यात आला असल्याने अधिकाऱ्यांपुढे वेळे मारून नेण्याची संधी प्राप्त झाली आहे. नियमितपणे बिट निरिक्षण अहवाल संबंधित वनाधिकाऱ्यांकडे सादर केले जातात. मात्र वरील दोन्ही बिटाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असूनही वृक्षकटाईचा अहवाल निरंक दाखविण्याचा प्रताप बिट निरिक्षकाकडून केला जात आहे. यात अधिकार व जबाबदारीची पूर्णता पायमल्ली होत आहे. शासनाचा महसूल बुडत असल्याने अवैध सागवान वृक्षतोडीस जबाबदार असलेल्या वनरक्षक व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी सावलखेडा व पळसगाव वासीयांनी केली आहे.