शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटांवर इंटरनेट कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:59 IST

रेतीची वाहतूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकावा लागतो. मात्र रेतीघाटांवर इंटरनेटची समस्या गंभीर असल्याने इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण जात आहे.

ठळक मुद्देकंत्राटदार त्रस्त : इन्व्हॉईस क्रमांक मिळण्यास अडचण; वाहनांची लागते रांग

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : रेतीची वाहतूक करण्यासाठी देण्यात येणाऱ्या टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकावा लागतो. मात्र रेतीघाटांवर इंटरनेटची समस्या गंभीर असल्याने इन्व्हॉईस नंबर मिळण्यास अडचण जात आहे. परिणामी घाटावर ट्रॅक्टरची मोठी रांग लागत आहे.रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी शासनाने रेती वाहतूक व उपशाचे नियम अतिशय कडक केले आहेत. रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाकडे टीपी दिली जात होती. मात्र बºयाचवेळा एकाच टीपीवर अनेक ट्रॅक्टर रेती नेली जात होती. याला आळा घालण्यासाठी शासनाने टीपीवर इन्व्हॉईस नंबर टाकणे आवश्यक केले आहे. यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. इन्व्हॉईस नंबर मिळविण्यासाठी एन्ट्री करताना वाहन क्रमांक, वाहन चालविणाºया चालकाचे नाव, पत्ता, मोबाईल, रेती जेथे विकली जाणार आहे, त्या ठिकाणाचे व खरेदीदाराचे नाव, रेती निर्गमित केल्याचा दिनांक व वेळ, पावती वैधता दिनांक व वेळ टाकावा लागतो. यासाठी संबंधित रेतीघाट मालकाला सॉफ्टवेअर व लॉग ईन आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक आहे. मात्र इंटरनेटची समस्या रेतीघाटांवर गंभीर आहे.गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रेतीघाट सुद्धा अधिक आहे. मात्र येथील बहुतांश रेतीघाट जंगलव्याप्त भागात आहेत. जंगल भागात कव्हरेजची समस्या अतिशय गंभीर आहे. जंगलामुळे कव्हरेज राहत नाही. परिणामी आॅनलाईन एन्ट्री करताना उशीर होतो. एक एन्ट्री करण्यासाठी २० मिनीटे तर अर्धा तासाचा कालावधी लागते. तोपर्यंत ट्रॅक्टर रेतीने भरली जाते. मात्र इन्व्हॉईस नंबर मिळत नाही. प्रत्येक ट्रिपच्या वेळी चालकाकडे इन्व्हॉईस नंबर असलेली टीपी असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर रेती अवैध माणून महसूल विभाग जवळपास सव्वा लाख रूपयांचा दंड ठोठावतो. त्यामुळे टीपीशिवाय वाहन पुढे नेण्याची हिंमत वाहनचालक करीत नाही. इन्व्हॉईस नंबर मिळविण्यासाठी उशीर होत असल्याने रेतीघाटांवर ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनांची मोठी रांग लागली असल्याचे दिसून येत आहे.इन्व्हॉईस नंबरमुळे रेती तस्करीवर फार मोठा आळा बसण्यास मदत झाली असली तरी इन्व्हॉईस नंबर मिळत नसल्याने रेती कंत्राटदार सुद्धा त्रस्त झाले आहेत.विशेष म्हणजे सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच रेती उपसण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यातही सायंकाळी ६ वाजताच्या पूर्वी ट्रॅक्टर रिकामी होणे बंधनकारक करण्यात आले आहे. कधीकधी ट्रॅक्टरमध्ये बिघाड निर्माण झाल्यास ट्रॅक्टर रिकामी करण्यास उशिर होतो. अशाही ट्रॅक्टरवर दंड आकारला जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टरमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाळू घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरेप्रत्येक वाळू घाटाच्या ठिकाणी रेतीघाट मालकाला स्वत:च्या खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा लागणार आहे. ज्या ठिकाणी वाळू भरली जाते, त्या ठिकाणी एक कॅमेरा व सर्व वाहने ज्या ठिकाणावरून ये-जा करतात अशा ठिकाणी एक कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी रेतीघाटांना भेट देऊन अधूनमधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.