शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भेंडाळा परिसरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र या भागातील अंतर्गत रस्त्यांना जोरदार फटका बसून दुरवस्थेत भर पडते.

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : वाहनधारक त्रस्त; पावसाळ्यात आवागमनास होणार अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे नवीन रस्त्यांचीही वाट लागली. खड्डेमय झालेल्या रस्त्यांची डागडुजी यावर्षीच्या उन्हाळ्यात करणे अपेक्षित होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या भेंडाळा परिसरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याशिवाय गावातील अंतर्गत रस्ते दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र या भागातील अंतर्गत रस्त्यांना जोरदार फटका बसून दुरवस्थेत भर पडते. भेंडाळा परिसरातील अनेक अंतर्गत रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. तेलतून तुकूम ते एकोडी मार्ग तसेच वेलतूर तुकूम ते कळमगाव, सगनापूर ते नवेगाव माल, कान्होली ते मुरखळा, भेंडाळा ते रामाळा, दोटकुली बसस्टॉप ते वाघोली, भेंडाळा ते वेलतुर तुकूम, फोकुर्डी ते नवेगाव माल या सर्व रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर डांबर टाकल्यानंतर चाळण होईपर्यंत लक्ष दिले जात नाही. रस्त्यांबाबत लोकांच्या जेव्हा तक्रारी येतात तेव्हाच प्रशासनाला जाग येते. या परिसरातील काही रस्त्यांवर तर अद्याप एकदाही डांबर पडलेले नाही. असे रस्ते सुध्दा या परिसरात बघायला मिळतात. अशी गंभीर परिस्थिती ग्रामीण भागातील रस्त्यांची आहे. या भागांतील अगदी थोडेच रस्ते चांगले आहेत पण ते देखील दरवर्षीच्या पावसाळ्यात उखडून जाण्याची भीती असते. या गावांतील अंतर्गत रस्तेदेखील मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यांचे नव्याने खडीकरण करावे, अशी मागणी भेंडाळा परिसरातील नागरिकांनी केली आहे.अरूंद रस्त्यांच्या कडा भरण्याची मागणीभेंडाळा परिसरातील ग्रामीण भागात जाणारे रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यांच्याही कडा खोलगट आहेत. मात्र कडांवर मुरूम टाकण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मार्र्कंडाकडे जाणाऱ्या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यांच्या कडा भरणे आवश्यक आहे. आधीच अरूंद असलेले रस्ते वाहतुकीस अडसर ठरत असतानाच कडा खोलगट झाल्याने अपघाताचा धोका आहे.परिसरातील रस्त्यांच्या वळणावर दुतर्फा झुडपे वाढली असल्याने विरूद्ध दिशेने येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली विशेषत: वळणावरील झुडपे तोडणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून झुडपे तोडावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा