शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साखरगाठींचे अतिसेवन धोकादायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:54 IST

साखरगाठीची निर्मिती करण्यासाठी साखर, जाडा दोरा, दूध पावडर, टिनोपॉल व हायड्रोपॉवर यासारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो.

ठळक मुद्देहोळी सणाची परंपरा : रासायनिक पदार्थांचा वापर केलेल्या गाठ्या बाजारात

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : साखरगाठीची निर्मिती करण्यासाठी साखर, जाडा दोरा, दूध पावडर, टिनोपॉल व हायड्रोपॉवर यासारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे साखरगाठीचे अतिसेवन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने साखरगाठीच्या सेवनावर नियंत्रण पालकांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.होळीच्या सणानिमित्त लहान मुलांना साखरगाठी भेट देण्याची परंपरा विदर्भासह संपूर्ण महाराष्टÑात आहे. प्रत्येक नातेवाईक व शेजारी साखरगाठी देत असल्याने मोठ्या प्रमाणात साखरगाठ्या जमा होतात. बºयाच मुलांना गोड पदार्थ आवडत असल्याने साखरगाठ्यांची मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. साखरगाठी ही कडक राहत असल्याने लहान मुलाला ती चावत नाही. त्यामुळे लहान मुल साखरगाठी चोखतात. खेळत असतानाच गाठी चोखली जात असल्याने बºयाचवेळा धूळ व मातीसोबत संपर्क येतो. बºयाचवेळा गाठीवर माशाही बसतात व त्याच गाठीचे सेवन लहान मुले करतात. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे हगवन लागण्याची शक्यता अधिक राहते.गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश गाठ्या नागपूर येथून आणल्या जातात. नागपूर येथे साखरगाठ्या निर्मितीचे अनेक गृह उद्योग आहेत. साखरगाठी आकर्षक दिसावी. ती लवकर बनावी यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. सदर साखरगाठी आरोग्यास धोकादायक आहे.साखरगाठ्यांचे भाव स्थिरयावर्षी गडचिरोली शहरात साखरगाठ्या ३० रूपये पाव व १०० रूपये किलो या दराने विकल्या जात आहेत. मागील वर्षी सुध्दा हाच दर होता. गडचिरोली शहरात विविध ठिकाणी साखरगाठ्या विक्रीची दुकाने लागली आहेत.१५ दिवसानंतर गुढीपाडव्याचा सण येतो. नवीन वर्ष आनंदी जावे यासाठी साखरगाठ्यांचा प्रसाद करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर गुढीच्या सभोवताल साखरगाठी बांधण्याची परंपरा आहे. त्यामुळे गुढीपाडव्यापर्यंत साखरगाठी जपून ठेवली जाते.साखरगाठ्यांचे अतिसेवन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे साखरगाठ्यांच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. मुलांना जास्त साखरगाठ्या खाण्यासाठी देऊ नये. अतिसेवनामुळे लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता असते.- संतोष कांबळे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली