शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

२३ हजार हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:32 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील १९ हजार २०१ पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे २३ हजार ५४० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. पीक कर्ज न घेणाºया शेतकऱ्यांनी सुध्दा विमा काढला आहे. त्यामुळे विम्याचे क्षेत्र पुन्हा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देगडचिरोली : जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील १९ हजार २०१ पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे २३ हजार ५४० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. पीक कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सुध्दा विमा काढला आहे. त्यामुळे विम्याचे क्षेत्र पुन्हा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर या परिस्थितीत शेतीचे मोठे नुकसान होते. कधीकधी उत्पादन खर्च सुध्दा भरून निघत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडते. पिकांचा विमा काढण्याची योजना मागील २० वर्षांपासून आहे. मात्र शेतकऱ्यांना ती सक्तीची नसल्याने बरेच शेतकरी कर्ज घेतले तरी पिक विमा काढत नव्हते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मात्र प्रत्येक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला विमा काढणे सक्तीचे केले आहे. आठ दिवसांपूर्वी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पऱ्हे व इतर पिके करपायला लागली होती. याच कालावधीत शासनाने पीक विमा काढण्यास मुदतवाढ दिली. त्यामुळे पीक कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनीही पीक विमा काढला.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार.धान पिकासाठी ६७५ रुपये हेक्टरी भरावे लागतात. या रकमेतून ३३ हजार ७५० रुपये एवढ्या किमतीचा विमा काढला जातो. सोयाबिनसाठी ६६५ रुपयात जास्तीत जास्त ३३ हजार २५० रुपये एवढे विमा संरक्षण मिळते. कापसासाठी २ हजार १५० रुपये हप्ता असून ४३ हजार रुपये पीक संरक्षण आहे.विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा