आरमोरी : तालुक्यात आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तसेच अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. सदर रिक्त पद त्वरित भरून नागरिकांना आरोग्याच्या सोयी पुरवा, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी येथील राजीव गांधी सभागृहात अधिकाऱ्यांना देऊन चांगलेच खडेबोल सुनावले. आढावा बैठकीला जि. प. सदस्य लक्ष्मी मने, कुसूम रणदिवे, पूनम गुरनुले, पं. स. सभापती सविता भोयर, उपसभापती चंदू वडपल्लीवार, पं. स. सदस्य सचिन महाजन, सुनीता कुथे, तहसीलदार दिलीप फुलसंगे, संवर्ग विकास अधिकारी शालिक धनकर, यू. डी. मांदाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खिरसागर नाकाडे, पं. स. सदस्य अशोक वाकडे, सरपंच शालू इंदूरकर, उपसरपंच निंबेकार, सदानंद कुथे, पंकज खरवडे, गोपाल भांडेकर, भारत बावनथडे, प्रा. प्रदीप बोडणे उपस्थित होते. आ. गजबे यांनी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना समस्या मार्गी लावण्याचे यावेळी निर्देश दिले. या बैठकीला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)या समस्यांवर झाली चर्चाआढावा सभेत बांधकाम, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, विद्युत, कृषी व वन विभागातील कामांवर चर्चा झाली. तालुका कृषी कार्यालयातील रिक्त पदे, त्वरित भरावे, तसेच अंगणवाडी केंद्रात शौचालयाची निर्मिती करावी आदी प्रश्नांवर घमासान झाले. शेतकऱ्यांना कृषी पंप त्वरित लावून देणे तसेच आष्टा येथील पाण्याच्या टाकीचे काम त्वरित पूर्ण करणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली.
आरोग्य सोयी पुरविण्याचे निर्देश
By admin | Updated: February 25, 2015 01:35 IST