लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज/मोहटोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाई आल्या नसत्या तर कदाचित भीमराव आंबेडकर नावाचा सूर्य तळपला नसता. डॉ. आंबेडकर यांच्या यशात रमाई यांचे परिश्रम, त्याग, सहनशीलता यासारखे गुण महत्त्वाचे आहेत. रमाईने दिलेल्या त्यागाला तोड नाही. त्यामुळे रमाई यांच्या त्यागाची आठवण ठेवून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राजरतन आंबेडकर यांनी केले. देसाईगंज येथील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या रमाई जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.सम्यक जागृत महिला समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वालदे, यशोदा मेश्राम उपस्थित होत्या.राजरतन आंबेडकर हे कुरखेडा येथील कार्यक्रम आटोपून देसाईगंज येथील दीक्षाभूमीला सदिच्छा भेट देण्याकरिता आले होते. माता रमाई यांचा जीवनपट उलगडण्यासोबतच डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक व्यवस्थेवर देखील राजरतन आंबेडकर यांनी प्रकाश टाकला. राजरतन आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू होत. याप्रसंगी समितीच्या सदस्य सुमित्रा रामटेके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन जयश्री लांजेवार तर आभार ममता जांभुळकर यांनी मानले.
माता रमार्इंच्या त्यागातून प्रेरणा घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:26 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाई आल्या नसत्या तर कदाचित भीमराव आंबेडकर नावाचा सूर्य तळपला नसता. डॉ. आंबेडकर यांच्या यशात रमाई यांचे परिश्रम, त्याग, सहनशीलता यासारखे गुण महत्त्वाचे आहेत.
माता रमार्इंच्या त्यागातून प्रेरणा घ्या
ठळक मुद्देराजरतन आंबेडकर : देसाईगंजच्या दीक्षाभूमीवर जयंती उत्सव