शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबसची तपासणी करा अन्यथा होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:31 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची शाळा सुरू होण्याच्या पूर्वी फेरतपासणी करणे आवश्यक आहे. अशी तपासणी न करता वाहन तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे आढळल्यास त्या स्कूल बसेसवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिला आहे.

ठळक मुद्देपरिवहन विभागाचा इशारा : आॅनलाईन सादर करता येणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची शाळा सुरू होण्याच्या पूर्वी फेरतपासणी करणे आवश्यक आहे. अशी तपासणी न करता वाहन तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे आढळल्यास त्या स्कूल बसेसवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिला आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार उन्हाळी सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणाºया बस, व्हॅनची फेरतपासणी करणे आवश्यक आहे. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य असले तरी अशा वाहनांनी शालेय सत्र सुरू होण्यापूर्वी तपासणी अधिकाºयाकडे वाहन सादर करून वाहन तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची खातरजमा करावी, असे परिवहन विभागाने कळविले आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दैनंदिन कामाचे संगणकीकरण झाले आहे. बहुतांश कामे संगणकीय प्रणालीद्वारे केली जातात. वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील कामे परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून करता येतात. अर्जदारांनी स्वत:ची कामे स्वत: करून मध्यस्थांच्या उच्चाटनासाठी कार्यालयाला सहकार्य करावे. संगणकीय प्रणालीत काही अडचण उद्भवल्यास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.वाहन तपासणी मोहीम सुरूशालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीविषयी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचे गांभिर्य लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीतर्फे स्कूल बस तपासणी मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक सेवेकरिता वापरण्यात येत असलेल्या वाहनांची सुध्दा तपासणी केली जाणार आहे. त्याकरिता वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे सर्व दस्तावेज विधीग्राह्य असल्याची खात्री करावी. विनायोग्यता प्रमाणपत्र किंवा वाहन विमा नसताना वाहन सार्वजनिक रस्त्यावर वापरताना आढळल्यास अशा वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.