शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांसाठी विमाशिसंचे धरणे

By admin | Updated: July 3, 2016 01:29 IST

खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खासगी आश्रमशाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी

शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : सेवा समाप्त केलेल्या शिक्षकांना सेवेत पूर्ववत करागडचिरोली : खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खासगी आश्रमशाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.संच मान्यतेबाबतचा २८ आॅगस्ट २०१५, ८ जानेवारी व २७ मे २०१६ आदी तिन्ही शासन निर्णय अधिग्रहीत करून नव्याने सशक्त, शिक्षकांना पुरक व अन्यायकारक नसलेला एकच निर्णय घेण्यात यावा, संच मान्यतेचे जुने निकष कायम ठेवावे, जुनी पेंशन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या अनुदानासाठी पात्र ठरवावे, त्यांना १०० टक्के अनुदान घोषित करावे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या सातव्या आयोगाच्या संभाव्य वेतन विषय शिफारशी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भी पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद करावी, अतिरिक्त कारणाने सेवा समाप्त केलेल्या शिक्षण सेवकांना सेवेत पूर्ववत करावे आदी मागण्यांचे निवेदन प्रभारी शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, अजय लोंढे, शेमदेव चाफले, सुरेंद्र मामिडवार, यशवंत रायपुरे, संजय खांडरे, संजय दौरेवार, संजय चांदेकर, रवींद्र बांबोळे, संजय घोटेकर, पुरूषोत्तम उरकुडे, भोयर, ढगे, महेंद्र वाकडे, हंसराज लांडगे, रेवनाथ लांजेवार, अनिल गांगरेड्डीवार, यादव बानबले, नागापुरे हजर होते. (शहर प्रतिनिधी)