शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

वनवे थांबविण्यासाठी वनविभागाची नाविण्यपूर्ण उपाययाेजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST

जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा ...

जंगलांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोह फुलाचा हंगाम सुरू झाला की मोहफुलं वेचणारे लोक झाडाखालील पालापाचोळा गोळा करतात. त्या कचऱ्याला त्याच ठिकाणी जाळून तो न वीजवता घरी निघून जातात. ही आग पसरत जाऊन संपूर्ण जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी येते. यात वनांचे आणि वन्यजीवांचे फार मोठी हानी होते. दरवर्षी लागणाऱ्या हानीमुळे पर्यावरणाची अपरिमित हानी हाेते. हे टाळण्यासाठी या वर्षात वन विभागाने स्वतः मोह फुलाच्या झाडा खालील पालापाचोळा ब्लोअर मशीनद्वारे गाेळा केला जात आहे. नंतर ताे कचरा जाळून टाकण्याचा मोहीम उघडली आहे. स्वतः वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन मजूर जंगलात असणाऱ्या मोहफुलाच्या झाडा खालील पालापाचोळा स्वतः नष्ट करीत आहेत. त्यामुळे लोकांना मोह फुलाखालील जागा स्वच्छ करण्यासाठी पालापाचोळ्याचे जाळण्याची गरज पडणार नाही. तरीही पालापाचाेळा स्वताहून जाळून ती आग जंगलात पसरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र वन विभागाने काढले आहे. वैरागड उपवन क्षेत्रात क्षेत्र सहायक साईनाथ सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो, नारायण शिवरकर, प्रवीण धात्रक वणव्यांना प्रतिबंध घालण्यासाठी काळजी घेत आहेत.

जंगलात गस्ती वाढल्या

जंगलांना लागणाऱ्या आगीवर प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी पहाटेपासूनच जंगलात गस्त घालत आहेत. गावागावात वनव्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी यांना याबाबत सूचना देऊन जंगलांना आगी लागण्याचे कोणी जर अघोरी कृत्य करत असेल तर त्याला तात्काळ वन विभागाला कळवावे यासाठी मोबाइल नंबर सुद्धा वन विभागाने प्रसिद्ध केले आहेत. काही तेंदू ठेकेदार आपल्या मजुरांकरवी जंगलांना मुद्दाम आगी लावतात. अशा कंत्राटदारावरही कारवाई केली जााणार आहे.