शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

३१३ मंडळांचा दारू व खर्रामुक्त गणेशोत्सवासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

दारू व तंबाखूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून हे दोन्ही पदार्थ हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथद्वारे २०१६ पासून प्रयत्न केले जात आहेत. विविध माध्यमातून त्यासाठी जनजागृती केली जात आहे. गणेशोत्सवात सर्वत्र जल्लोष असतो. अशा जल्लोषातही काही जण दारू पिऊन इतरांच्या आनंदावर विरजण घालतात.

ठळक मुद्देगावोगावच्या मंडपातून जनजागृती : घरातल्या ‘बाल गणेशा’ला खºर्यापासून वाचवण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्या सर्वत्र सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या उत्साहात गडचिरोली जिल्ह्यातीग अनेक मंडळांनी धार्मिक भाव जपण्यासोबत व्यसनमुक्तीसाठी जनजागृती सुरू केली आहे. दारू व खºर्यासारखे अपवित्र व्यसन करणाऱ्यांनी गणपतीपासून दूर राहण्याचा सल्ला देत या व्यसनांपासून आपल्या घरातील बाल गणेशाला, अर्थात घरातल्या बालकाला दूर ठेवण्याचे आवाहनही फलकांच्या माध्यमातून केले जात आहे. जिल्हाभरात ३१३ पेक्षा अधिक मंडळांनी अशा जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.दारू व तंबाखूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून हे दोन्ही पदार्थ हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथद्वारे २०१६ पासून प्रयत्न केले जात आहेत. विविध माध्यमातून त्यासाठी जनजागृती केली जात आहे. गणेशोत्सवात सर्वत्र जल्लोष असतो. अशा जल्लोषातही काही जण दारू पिऊन इतरांच्या आनंदावर विरजण घालतात. गणेश मंडपांमध्ये येऊनच खर्रा खात बसतात. हा प्रकार टाळण्यासाठी मुक्तिपथद्वारे दारू व तंबाखूमुक्त गणेशोत्सव हा उपक्र म हाती घेण्यात आला.दारू व तंबाखूमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुक्तिपथ चमूद्वारे जिल्ह्यातील गणेश मंडळांना करण्यात आले. गणेश मंडळांमध्ये कुणीही दारू व खर्रा खाऊन येऊ नये यासाठी मंडपांमध्ये ‘माझ्या दारात दारू नको, खर्रा नको’, ‘ज्या तोंडाने गणपतीचे नाव घ्यावे त्याच तोंडात दारू व खर्रा टाकाल का?’ असे संदेश असलेले फलक लावण्यात आले.लहान मुले खर्रा या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी ‘घरातल्या बालगणेशाला खºर्यापासून वाचवा’, अशी भावनिक हाकही देण्यात आली. परिणामी जिल्ह्यातील शंभरावर गावांतील ३१३ गणेश मंडळांनी दारू व खर्रामुक्त गणेशोत्सव साजरा केला.खर्रा तोंडात असेल तर दर्शनासाठी यायचेच नाही अशी भूमिका मंडळांनी घेतली. अनेक गावांनी गावसभेमध्ये दारू व खर्रामुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा ठरावही घेतला होता. याला चांगला प्रतिसाद मिळालात्रगणेश मंडपांत दारू-खºर्याला बंदीमुक्तिपथ गाव व शहर संघटनांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील ४१, अहेरी १३, आरमोरी २२, चामोर्शी ४०, देसाईगंज ६०, धानोरा २१, एटापल्ली १०, कोरची १७, कुरखेडा ४०, मुलचेरा ७, सिरोंचा ३२ आणि भामरागड तालुक्यातील ११ अशा जिल्हाभरातील तब्बल ३१३ गणेश मंडळांनी दारू व तंबाखूमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती केली. मंडळामध्ये नशायुक्त पदार्थ चालणार नसल्याच्या सूचनाच आयोजकांनी केल्या. त्यामुळे गावागावांमध्ये दारू व तंबाखूमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे.विसर्जन मिरवणुकाही निघणार दारूमुक्तगणेश मूर्तीचे विसर्जन करताना मोठी मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशाच्या निनादात, गुलाल उधळत निघणाºया या मिरवणुकांमध्येही दारू पिऊन या सणाच्या पावित्र्याला गालबोट लावण्याचा प्रकार काही जण करतात. असा प्रकार घडू नये यासाठी गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. मिरवणुकीत दारू पिऊन कुणी आल्यास त्याला घरचा रस्ता दाखविला जाईल, अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव