शुक्रवारपासून प्रारंभ : वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकाची माहितीदेसाईगंज : रेल्वे प्रवाशांना चक्रिय यात्रा तिकीट वितरण शुक्रवारपासून वडसा रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे नागपूरचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मुखोपाध्याय यांनी दिली आहे.वडसा रेल्वे स्थानकाला आकस्मिक भेट देऊन वडसा येथे चक्रिय यात्रा तिकीट सुरू करून रेल्वे प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना मोठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यापूर्वी चक्रिय यात्रा तिकिटसाठी प्रवाशांना नागपूर, गोंदिया, बल्लारशाह रेल्वे स्थानक गाठावे लागत होत. मात्र ही सुविधा देसाईगंज येथे सुरू झाल्याने प्रवाशांचा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे स्टेशन प्रबंधक पी. एस. भोंडे, आरक्षण प्रमुख रमेश परते, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य डॉ. विष्णू वैरागडे आदी उपस्थित होते.२५ जणांना पकडलेवडसा रेल्वे स्थानकावर आकस्मिक तिकीट चेकिंग करण्यात आली. यात जवळपास २५ प्रवाशांजवळ तिकीट नसतानाही ते प्रवास करताना आढळले. तर १० जणांनी विना तिकीट प्लाटफार्मवर प्रवेश केला असता त्यांनाही पकडण्यात आले. तर १५ जण पादचारी पुलाचा वापर न करता रेल्वे पटरीवरून बेकायदेशीरपणे आवागमन करताना दिसून आले. या सर्वांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले आहे.
वडसा रेल्वे स्थानकावर चक्रिय यात्रा तिकीट सुरू
By admin | Updated: November 21, 2015 01:57 IST