शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनसाठी अहेरीत रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:11 IST

सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मुख्य मागणीकडे पालकमंत्री यांचे लक्ष वेधून घेणे तसेच अमरावती येथे ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पेन्शन हक्क परिषदेत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यानी उपस्थित राहावे, या दुहेरी उद्देशातून २७ जानेवारी रोजी आलापल्ली ते अहेरीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : दीड हजार कर्मचाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मुख्य मागणीकडे पालकमंत्री यांचे लक्ष वेधून घेणे तसेच अमरावती येथे ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पेन्शन हक्क परिषदेत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, या दुहेरी उद्देशातून २७ जानेवारी रोजी आलापल्ली ते अहेरीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत जवळपास दीड हजार कर्मचारी सहभागी झाले.१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून त्यांना परिभाषीत अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. अंशदायी पेन्शनयोजना अन्यायकारक असल्याने कर्मचाऱ्यांनी याविरोधात लढा सुरू केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिल्ली येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना दिल्ली येथील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. त्यानुसार कार्यवाही सुध्दा सुरू केली आहे. दिल्लीचे सरकार जुनी पेन्शन लागू करू शकते. तर अन्य राज्य शासन का लागू करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अमरावती येथे राज्यस्तरीय पेन्शन हक्क परिषद ३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. परिषदेला मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, याबाबत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने आलापल्ली ते अहेरी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर मागण्यांचे निवेदन पालकमंत्री यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मागील महिन्यात ाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सत्तेवर असलेल्यांना पराभव पत्करावा लागला. जुनी पेन्शन योजना लागू केली जात नसल्याने विद्यमान महाराष्ट्र राज्य शासनाविरोधातही कर्मचारी मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनातून केली.रॅलीचे नेतृत्व जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य उपाध्यक्ष योगेश शेरेकर, जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, जिल्हा उपाध्यक्ष अंकूश मैलारे, जिल्हा सचिव बापू मुनघाटे, अहेरी तालुकाध्यक्ष सतिश खाटेकर, तालुका सचिव रमेश रामटेके, राज्य समन्वयक दशरथ पाटील यांनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चा