शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या स्मार्ट फोनमधील माहिती सुरक्षित नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:49 IST

तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्मार्ट फोन वापरत असाल तरी तुमच्या मोबाईलमधील माहिती, एवढेच नाही तर फेसबूक, व्हाट्स अ‍ॅपमधील संवाद, ई-मेल कोणालाही पाहणे शक्य आहे. त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता असल्यामुळे वेळीच सावध व्हा, असा सावधानतेचा इशारा माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ महेश रखेजा यांनी सोमवारी येथे एका कार्यशाळेत दिला.

ठळक मुद्देआयटीतज्ज्ञ महेश रखेजा यांनी दिला सावधानतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्मार्ट फोन वापरत असाल तरी तुमच्या मोबाईलमधील माहिती, एवढेच नाही तर फेसबूक, व्हाट्स अ‍ॅपमधील संवाद, ई-मेल कोणालाही पाहणे शक्य आहे. त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता असल्यामुळे वेळीच सावध व्हा, असा सावधानतेचा इशारा माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ महेश रखेजा यांनी सोमवारी येथे एका कार्यशाळेत दिला.जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलीस सायबर शाखेच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात पोलीस आणि पत्रकारांसाठी ‘फेक न्यूज’वर कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात रखेजा यांनी माहिती तंत्रज्ञानातील अनेक आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा प्रात्यक्षिकासह करून दाखवला. समाज माध्यमातून फेक न्यूज (खोट्या बातम्या) कशा पसरविल्या जातात. त्यामागे कोणकोणती कारणे असतात. आपण अनभिज्ञपणे त्याला कसे बळी पडतो, त्यापासून वाचण्यासाठी काय करावे यावर राखेजा यांनी सखोल मार्गदर्शन केले. याचवेळी आपल्या नकळत आपल्या मोबाईलमधील माहिती कशी चोरली जाते याचेही त्यांनी उदाहरण दिले. त्याचा दुरूपयोग आतंकवादी कारवाया, राजकीय, धार्मिक आणि मार्केटिंगसाठी केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. त्यामुळे मोबाईलमध्ये पासवर्ड, एटीएम पीन यासारख्या गोष्टी न ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. याशिवाय कोणतेही चिनी कंपन्यांचे मोबाईल वापरणे जास्त धोकादायक असल्याचेही रखेजा म्हणाले.या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप चौगावकर, गडचिरोलीचे ठाणेदार दीपरतन गायकवाड, नक्षल सेलचे निरीक्षक संजय सांगळे व इतर अधिकारीगण प्रामुख्याने उपस्थित होते. आभार प्रदर्शन सायबर सेलचे निरीक्षक अजित राठोड यांनी केले.