बामणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी विभाग सिरोंचाच्या वतीने रोमपल्ली येथे बुधवारी किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पशुपालकांना शेळी पालन दुग्ध व्यवसाय व भाजीपाला लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.अध्यक्षस्थानी माजी सरपंच बिरा मडावी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. आय. हातझाडे, चंद्रमोहन मेरम, व्ही. आर. रसाळे, आर. बी. खटींग उपस्थित होते. यावेळी शेतकरी व पशुपालकांना दुग्ध व्यवसाय शेळी पालन याविषयी हातझाडे यांनी मार्गदर्शन केले. चंद्रमोहन मेरम यांनी हळद व भाजीपाला लागवड याची माहिती दिली. रसाळे यांनी धानाची श्री पद्धतीने लागवड व थेट यंत्राच्या सहाय्याने पेरणीचे तंत्रज्ञान समजावून सांगितले. खटींग यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. संचालन व आभार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ओ. वाय. लांजेवार यांनी केले. लक्का गावडे, बंडू गावडे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
पशुपालकांना शेळी पालनाची माहिती
By admin | Updated: March 22, 2015 00:36 IST