शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांच्या प्रभावाने २५० शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:53 IST

तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या बामणी व चेरपल्ली या गावातील पशुपालकांच्या अडीचशेपेक्षा जास्त बकऱ्या मागील आठ दिवसांत अचानकपणे मृत्यूमुखी पडल्या आहेत.

ठळक मुद्देपशुपालक धास्तावले : बामणी व चेरपल्लीत तेलंगणातील शेतकºयांनी केली होती फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या बामणी व चेरपल्ली या गावातील पशुपालकांच्या अडीचशेपेक्षा जास्त बकऱ्या मागील आठ दिवसांत अचानकपणे मृत्यूमुखी पडल्या आहेत. कापसावर व इतर पिकांवर होत असलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या असल्याची माहिती गावकºयांनी दिली आहे.तेलंगणा राज्यातील काही नागरिकांनी बामणी व चेरपल्ली येथील शेतकऱ्यांची ५०० एकरपेक्षा अधिक जमीन भाड्याने घेतली आहे. या जमिनीवर त्यांनी कापूस व इतर पिकांची लागवड केली आहे. रोगांच्या प्रादुर्भावापासून पिकाला वाचविण्यासाठी तेलंगणातील शेतकरी अत्यंत जहाल कीटकनाशके फवारत आहेत. त्या शेताजवळच्या झाडांचा पाला खाल्यांमुळे बामणी व चेरपल्ली येथील पशुपालकांच्या ३०० हून अधिक बकऱ्या मागील आठ दिवसांत मृत्यूमुखी पडल्या आहेत.बामणी येथील दुर्गय्या गोसाई कुमरम यांच्या सुमारे १५० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. याच गावातील आमरय्या कुमरम यांच्या २० बकऱ्या, मनोहर झाडे यांच्या १६ बकºया, नंदू सिडाम यांच्या १० बकºया, कुमरय्या चौधरी यांच्या २६ बकºया, साईनाथ सिडाम यांच्या सात बकऱ्या, वासुदेव आत्राम यांच्या मालकीच्या १० बकऱ्या, लक्ष्मण पेंदाम यांच्या १० व सुरेश पेंदाम यांच्या दोन बकऱ्या अशा एकूण जवळपास अडीचशे बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यामुळे या पशुपालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तेलंगणा राज्यातील गुंटूर येथील पी.व्यंकटरमन्ना, धनापती कट्टा व इतर चार शेतकऱ्यांनी बामणी व चेरपल्ली येथील ५०० एकरपेक्षा अधिक शेती केली आहे. या शेतकऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, हे शेतकरी जे कीटकनाशक फवारत आहेत, त्याची चौकशी करावी, त्याचबरोबर संबंधित शेतकºयांवर दंड ठोठावून दंडाची रक्कम शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी गावातील पशुपालकांनी केली आहे.घटनेची माहिती मिळताच अहेरी नगर पंचायतीचे सभापती नारायण सिडाम, नगरसेवक संजय झाडे, सामाजिक कार्यकर्ते रिजवान शेख यांनी गावात जाऊन पशुपालकांची भेट घेतली. यावेळी घडलेला प्रसंग डोळ्यात अश्रू ढाळत शेतकरी सांगत होते.कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांना सुटते खाजकापूस वेचण्यासाठी ज्या महिला जात आहेत, त्यांच्या अंगाला खाज सुटत आहे. चेहऱ्यावर सूज येत आहे. वृद्ध महिला मजुरांना गुडघा व हातपाय दुखण्याचा त्रास होत आहे. झाडाची पाने खाऊन आलेल्या बकरीचे लहान पिल्लू सुद्धा दूध पिल्यानंतर मरण पावत आहेत. यावरून कीटकनाशकांची तीव्रता किती भयानक असल्याचे दिसून येते.