लष्कर अळीचे एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांनी नियंत्रण करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मका पिकावरील नवीन लष्करी अळीच्या डाेक्याच्या पुढच्या बाजूस उलट वाय आकाराची खूण असते. शरीराच्या शेवटून दुसऱ्या भागात चाैकाेनी आकारात चार ठिपके दिसून येतात. या अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेताची खाेल नांगरणी दिवसा करावी. ज्यामुळे पक्ष्यांद्वारे किडीची वेगवेगळी अवस्था नष्ट हाेत असते. किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करावा आदीसह विविध उपाययाेजना कृषी विभागाने सांगितले आहे.
जैविक कीटकनाशक फवारणीसह रासायानिक कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असा सल्ला कृषी विभागाने दिला असून व्यवस्थापनाच्या अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम यांनी केले आहे.