सहा महिन्यांची गर्भवती असलेली सरिता रेणू पोदाडी व आठ महिन्यांची गर्भवती सविता सुंदर बोदाडे यांना त्रास होऊ लागला. लाहेरी प्राथमिक आराेग्य केंद्रात रूग्णवाहिका उपलब्ध आहे. मात्र गावात माेबाईल कव्हरेज नसल्याने रूग्णालयाशी संपर्क साधने शक्य झाले नाही. परिणामी आशा सेविकेने एका व्यक्तीला दुचाकीने लाहेरी येथे पाठवून रूग्णवाहीका आणण्यास सांगीतले. ताेपर्यंत दाेन्ही गराेदर माता व आशा स्वयंसेविका लाहेरीच्या दिशेने पायदळ निघाल्या. काही किमी अंतर चालत गेल्यानंतर रूग्णवाहिका पाेहाेचली. रस्त्यात असलेल्या गराेदर मातांना ग्रामीण रूग्णालय भामरागड येथे पाेहाेचवीले. प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरी अंतर्गत १४४ गावे आणि ९ उपकेंद्र आहेत. यात बहुतांश पदे रिक्त आहेत. बदली हाेऊन रिक्त झालेल्या पदावर दुसरा डाॅक्टर किंवा आराेग्य कर्मचारी येत नाही. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढतच चालली आहे.
बाॅक्स
दर महिन्याला तपासणी हाेत नाही
शहरातील गरोदर मातांची तपासणी दर महिन्यात होते. दुर्गम भागातील गराेदर महिलांना तपासणीसाठी प्राथमिक आराेग्य केंद्रात जावे लागते. मात्र आराेग्य केंद्राचे अंतर अधिक आहे. जाण्यास रस्ते नाहीत. वाहतुकीची साधने नाहीत. परिणामी गराेदर माता रूग्णालयात जात नाही. त्यामुळे त्यांची तपासणी हाेत नाही. आशा सेविकांचेच मार्गदर्शन लाभते. मात्र त्यांना आराेग्यविषयक फारसे ज्ञान नाही. जगात वाहतुकीची अनेक साधने असली तरी आदिवासी भागातील गराेदर मातांना अजूनही पायदळच प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.