शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रावती नदीवर संरक्षण कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:03 IST

सागवान व वन्यजीव तस्करी थांबवण्यासाठी महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक असलेल्या इंद्रावती नदीवर छत्तीसगड सरकारच्या वतीने छत्तीसगडच्या हद्दित संरक्षण कॅम्प व तिमेड येथे आंतरराज्यीय तपासणी नाका लावण्याचा निर्णय आंतरराज्यीय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे वनतस्करीला आळा बसणार आहे.

ठळक मुद्देआंतरराज्यीय बैठक : महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणाचे अधिकारी उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सागवान व वन्यजीव तस्करी थांबवण्यासाठी महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याची दुभाजक असलेल्या इंद्रावती नदीवर छत्तीसगड सरकारच्या वतीने छत्तीसगडच्या हद्दित संरक्षण कॅम्प व तिमेड येथे आंतरराज्यीय तपासणी नाका लावण्याचा निर्णय आंतरराज्यीय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे वनतस्करीला आळा बसणार आहे.महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये अत्यंत मौल्यवान सागवान आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दित असलेल्या सागवानाची तेलंगणा व छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होते. वन तस्कर इंद्रावती नदीचा फायदा उचलतात. महाराष्ट्र शासनाने वनतस्करी थांबविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दित संरक्षक कॅम्प बसविले आहे. मात्र छत्तीसगड राज्यात अशा प्रकारचे कॅम्प नसल्याने छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात वनतस्कर गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दित प्रवेश करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी इंद्रावती नदीच्या परिसरात छत्तीसगड राज्याच्या हद्दित छत्तीसगड शासनाच्या वतीने संरक्षण कॅम्प बसविण्याचा निर्णय आंतरराज्यीय बैठकीत घेण्यात आला. सदर बैठक २ व ३ जून रोजी छत्तीसगडमधील भोपालपट्टनम येथे पार पडली. या बैठकीला बिजापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तंबोली, डीएफओ एन. गुरूनाथन, जयशंकर भूपालपल्ली, सिरोंचाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, भामरागडचे उपवनसंरक्षक एन. सी. एस. बाला उपस्थित होते. या बैठकीत वन कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले.