शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तळागाळातील व्यक्ती न्यायापासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:03 IST

कायदा गरीब श्रीमंत हा भेद करीत नाही. ‘न्याय सर्वांसाठी’ ही शासनाची संकल्पना आहे. न्यायापासून तळागाळातील कोणताही व्यक्ती वंचीत राहू नये याकरिता विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. याचा लाभ सामान्य माणसांनी घ्यावा, असे आवाहन कुरखेडा न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. बागडे यांनी केले.

ठळक मुद्देन्या. एम. आर. बागडे : कुरखेडा येथे विधी सप्ताहानिमित्त जागृती

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : कायदा गरीब श्रीमंत हा भेद करीत नाही. ‘न्याय सर्वांसाठी’ ही शासनाची संकल्पना आहे. न्यायापासून तळागाळातील कोणताही व्यक्ती वंचीत राहू नये याकरिता विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. याचा लाभ सामान्य माणसांनी घ्यावा, असे आवाहन कुरखेडा न्यायालयाचे न्यायाधीश एम. आर. बागडे यांनी केले.तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विधी सप्ताहनिमित्त शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन गुरु वारी करण्यात आले. रॅली न्यायलय परिसरातून सुरू करण्यात आली. त्यानंतर शहरातील विविध वॉॅर्डातून रॅली फिरविण्यात आली. श्रीराम विद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. येथे मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी न्या. एम. आर. बागडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पुणे येथे कार्यरत न्यायाधीश संजय सहारे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक सरकारी अधिवक्ता अ‍ॅड. अविनाश नाकाडे, वकील संघाचे अ‍ॅड. प्रमोद बुद्धे, अ‍ॅड. उमेश वालदे, अ‍ॅड. छन्ना जनबंधू, अ‍ॅड. गोकूल नागमोती, अ‍ॅड. उईके, श्रीराम शाळा समितीचे अध्यक्ष वामनराव फाये, सामाजिक कार्यकर्ते पंढरी नाकाडे उपस्थित होते. पुढे मार्गदर्शनात न्यायाधीश बागडे म्हणाले, मोबाइलच्या दुरु पयोगाचे प्रमाण वाढत आहे. हे टाळत विद्यार्जनाकरिता मोबाइलचा उपयोग करावा, व्यसनांपासून दूर राहावे, अभ्यासाप्रति गांभीर्य दाखवत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. कायद्याचा चौकटीत जीवन व्यतीत करून आदर्श नागरिक म्हणून नावलौकिक करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन सहायक सरकारी अधिवक्ता अ‍ॅड. अविनाश नाकाडे तर आभार अ‍ॅड. उमेश वालदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधीसेवा समितीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.