शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या प्रगतीवरच भारताचे भविष्य अवलंबून

By admin | Updated: July 16, 2016 01:39 IST

देशाच्या एकूण लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. भावी भारताच्या प्रगतीचे स्वप्न बघायचे असेल तर

सु. सो. शिंदे यांचे प्रतिपादन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने कायदेविषयक शिबिर गडचिरोली : देशाच्या एकूण लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. भावी भारताच्या प्रगतीचे स्वप्न बघायचे असेल तर आजच्या विद्यार्थिनींना प्रत्येक बाबतीत प्रगत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सु. सो. शिंदे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै रोजी प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल येथे ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ व ‘मुलांचे हक्क व त्याची कायदे’ या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सु. सो. शिंदे बोलत होते. कार्यक्रमादरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश-१ तथा सहायक सत्र न्यायाधिश यू. एम. पदवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) ता. के. जगदाडे, मुख्य न्याय दंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. कमरूद्दीन लाखानी, महासचिव अजीज नाथानी, संचालक राजू देवानी, समीर हिरानी, प्राचार्य रहीम अमलानी, उपप्राचार्य सोहन मंगर यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक भाषणातून ता. के. जगदाडे यांनी मुलांविषयक कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सु. सो. शिंदे यांनी मुलांचे राज्यघटनेतील कायदे या संबंधी मार्गदर्शन केले. संचालन फाल्गुनी बोधलकर तर आभार सोहन मंगर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचे कर्मचारी व जिल्हा विधी प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)