शेतीवरही भर : १५ युवकांची समिती स्थापनधानोरा : शेतकऱ्यांना विविध समस्येतून बाहेर काढण्याकरिता भारतीय किसान संघाने पुढाकार घेतला आहे. धानोरा तालुक्यातील गिरोलानजीकच्या महावाडा या गावाचा समग्र विकास करण्यासाठी गावातील युवकांची १५ सदस्यीय समिती तयार किसान संघाने गठित केली आहे. शेतीसह पशुसंवर्धन, सिंचन, शिक्षण, आरोग्य, वन संवर्धन यावर विशेष भर दिला जाणार आहे. भारतीय किसान संघाच्या वतीने गावाचा समग्र विकास ही संकल्पना राबविली जाणार आहे. या संकल्पनेंतर्ग महावाडा गावाची निवड करण्यात आली. ग्रामीण व्यवस्थेला धक्का न लावता गावातील संसाधनांचा वापर करून गाव विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे. पशुपालन तसेच शेतीला शास्त्रीय तसेच व्यावसायिकतेला जोड देऊन शाश्वत आर्थिक व सामाजिक विकास साधला जाणार आहे. गाव विकासाची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणण्याकरिता गावातीलच १५ युवकांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीच्या मार्गदर्शनासाठी भारतीय किसान संघाच्या सदस्यांची एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये पे्रमानंद सोनटक्के, विकास सारवे, डॉ. दिलीप बर्वे, राजेश वाणी, देकाडे यांचा समावेश आहे. सदर कार्यात विदर्भ प्रांतमंत्री उदय बोरावार, जिल्हाध्यक्ष दिलीप कौशी व सदस्यांचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा कार्यालय मंत्री वि. दा. भृगुवार यांनी दिली आहे.
भारतीय किसान संघ करणार महावाडाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 01:22 IST