शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

धानाचे वाढीव नियोजन

By admin | Updated: May 7, 2017 01:28 IST

२०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कृषी विभागाचे नियोजन : दोन लाख हेक्टरवर यावर्षी लागवड लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : २०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ५३ हजार हेक्टर आहे. मागील वर्षी १ लाख ८४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. धान पिकासोबतच इतर पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. धान हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. विशेष करून गडचिरोली जिल्ह्यात खरीपामध्ये धान पिकाची लागवड करण्याचा ओढा असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासाठी पोषक आहे. धान पिकाच्या दृष्टीने प्रत्येक गावात मामा तलाव, बोड्यांची बांधणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५३ हजार हेक्टर आहे. असे असतानाही दरवर्षी धान पिकाच्या लागवडीमध्ये वाढ होत आहे. २०१६-१७ मध्ये १ लाख ८४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या हे प्रमाण १२१ टक्के आहे. २०१७ च्या खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. धान पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक असलेली खते, बि-बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार साहित्याचा जिल्ह्यात पुरवठा केला जाणार आहे. श्री पद्धतीच्या विस्तारासाठी प्रयत्न श्री पध्दतीने धानाची लागवड केल्यास बियानांचा खर्च कमी होतो. त्याचबरोबर उत्पादनामध्येही वाढ होत असल्याचे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याच पध्दतीने धान पिकाची लागवड करावी, यासाठी कृषी विभाग विशेष प्रचार मोहीम हाती घेणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अजुनही शेतकरी पारंपरिक पध्दतीनेच धान पिकाची लागवड करते. शेतकऱ्यांमध्ये श्री पध्दतीबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतले आहे. २०१६-१७ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात पिकासाठी प्रकल्प आधारित कार्यक्रम राबविण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रात्यक्षिके, सधन भात पिक प्रात्यक्षिके एक हजार हेक्टरवर घेतली जाणार आहे. संकरीत भाताचे प्रात्यक्षिक २०० हेक्टरवर, पीक पध्दतीवर आधारित पीक प्रात्यक्षिके ५०० हेक्टरवर, गादी वाफ्यावर टोकन पध्दतीने लागवडीचे प्रात्यक्षिक १०० हेक्टरवर घेतले जाणार आहे. ३०० हेक्टरवर यांत्रिकी पध्दतीने भाताची लागवड केली जाणार आहे. सोयाबिनकडे शेतकऱ्यांची पाठ गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, अहेरी व सिरोंचा तालुक्यात सोयाबिन पिकाचे उत्पादन घेतले जाते. या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार ६४६ हेक्टर आहे. २०१६-१७ या वर्षात केवळ १ हजार ६४९ हेक्टरवर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत २९ टक्के हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड झाली. २०१७-१८ मध्ये सोयाबिन पिकाच्या ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. सुरूवातीला शेतकऱ्यांनी सोयाबिन पिकाच्या लागवडीला पसंती दर्शविली होती. मात्र दरवर्षी सोयाबिनच्या उत्पादनात कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सोयाबिनच्या ऐवजी तूर व इतर पिकांची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे.