शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३५ पोलिसांना वेगवर्धित पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:24 IST

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी मंगळवारी जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती देऊन त्यांना सन्मानित केले. हे सर्व कर्मचारी नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी-६० पथकात कार्यरत आहेत.

ठळक मुद्देमहासंचालकांकडून सन्मानित : शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी मंगळवारी जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती देऊन त्यांना सन्मानित केले. हे सर्व कर्मचारी नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी-६० पथकात कार्यरत आहेत.एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या कसनासूरमधील पोलीस-नक्षल चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले होते. पोलिसांना मिळालेल्या त्या अभूतपूर्व यशासाठी सी-६० पथकाच्या ३५ लोकांना वेगवर्धित पदोन्नती देण्याची शिफारस पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा समावेश असलेल्या समितीने महासंचालकांकडे केली होती. त्याला मंजुरी देत महासंचालक पडसलगिकर यांनी त्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि.१५) गडचिरोली येथे सन्मानित केले.दोन अधिकाऱ्यांना स्टार लावून तर ३३ कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप केले. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना हेसुद्धा उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील सी-६० पथक हे नक्षलविरोधी अभियानातील देशातील उत्कृष्ट पथक असून या पथकाने आपली प्रतिमा भविष्यातही कायम ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर आलेल्या महासंचालकांनी सपत्निक शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. शहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या समस्यांवरही त्यांनी चर्चा केली.अतिसंवेदनशील हेडरी ठाण्याला भेटपोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर, अतिरिक्त महासंचालक संजय सक्सेना इतर अधिकाºयांनी मंगळवारी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या हेडरी पोलीस ठाण्याला भेट दिली. तेथील जवान कशा स्थितीत राहतात, कसे काम करतात याची माहिती जाणून घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणीही त्यांना जाणून घेतल्या.

टॅग्स :Policeपोलिस