लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याचे दिसत असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.गडचिरोली जिल्ह्याला लागूनच चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. या अभयारण्यात मागील पाच वर्षांत वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वाघाला स्वत:चे क्षेत्र आवश्यक राहते. यासाठी ताडोबातील वाघ नजीकच्या गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत. पाच वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या नगण्य होती. एखादेवेळी बिबट आढळून येत होते. मात्र आता वाघ व बिबट दोन्ही आढळून येत आहेत. विशेष करून देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये वाघांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.ताडोबाबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातही वाघांची संख्या वाढतीवर आहे. विशेष म्हणजे गावालगत वाघ दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रबी हंगामाची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र वाघांच्या भीतीने पिकांची राखण करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे रब्बी पिकेही धोक्यात आले आहेत. वाघांची संख्या वाढतीवरच राहिल्यास जिल्ह्यातील शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
जिल्ह्यात वाढली वाघांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST
गडचिरोली जिल्ह्याला लागूनच चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा हे वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे. या अभयारण्यात मागील पाच वर्षांत वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वाघाला स्वत:चे क्षेत्र आवश्यक राहते. यासाठी ताडोबातील वाघ नजीकच्या गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत. पाच वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या नगण्य होती.
जिल्ह्यात वाढली वाघांची दहशत
ठळक मुद्देपाच वर्षातील स्थिती : बंदोबस्ताची मागणी