शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
3
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
4
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
5
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
6
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
7
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
8
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
9
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
10
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
11
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
12
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
13
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
14
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
15
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
16
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
17
"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका
18
पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी
19
एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; जूनपासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
20
न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी; केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा

फ्रिजवल गायीमुळे वाढते दुधाची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:01 IST

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव व बेरोजगारांना दूध उत्पादनातून जोडधंदा मिळावा, या उद्देशाने देसाईगंज-कुरुखेडा मार्गावर चार किमी अंतरावरील विसोरानजीक तब्बल २१६ हेक्टर जागेवर सन १९७४-७५ साली वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले.

ठळक मुद्देवडसाच्या वळूमाता संगोपन केंद्रात १०० गायी दाखल

अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : देसाईगंज येथील वळूमाता संगोपन केंद्रात पुणे व नाशिक येथून फ्रिजवल जातीच्या १०० गायी आणण्यात आल्या असून ही संकरीत गाय असल्याने या गायीची रोगप्रतिकारक शक्ती मोठी आहे. या गायीमुळे दुधाची क्षमता वाढली असून दूध संकलनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव व बेरोजगारांना दूध उत्पादनातून जोडधंदा मिळावा, या उद्देशाने देसाईगंज-कुरुखेडा मार्गावर चार किमी अंतरावरील विसोरानजीक तब्बल २१६ हेक्टर जागेवर सन १९७४-७५ साली वळू माता संगोपन केंद्र स्थापन करण्यात आले. सुरूवातीला या ठिकाणी आस्ट्रेलिया येथून विदेशी होल्स्टन जातीच्या गायी आणल्या गेल्या. पुढे वातावरण बदलामुळे यात बदल करण्यात आला व १९८७ ला साहिवल जातीच्या गायीचे संगोपन केंद्र म्हणून घोषित करण्यात आले. सद्य:स्थितीत येथे साहिवल जातीच्या ७३ व इतर १०५ गायी आहेत. नाशिक व पुणे येथून फ्रिजवल जातीच्या १०० गायी काही दिवसांपूर्वीच येथे आणल्या असून त्यांची योग्यरित्या देखभाल केली जात आहे. फ्रिजवल ही संकरित गाय असून तिची रोगप्रतिकारक शक्ती उच्च आहे. नाशिक व पुणे येथील मिलिटरी डेहरी फार्म बंद झाल्याने तेथील फ्रिजवल जातीच्या १०० गायी राज्य शासनाने विसोरानजीकच्या वळूमाता केंद्रात पाठविल्या असल्याची माहिती आहे. नाशिक येथून ६० व पुणे येथून ४० अशा १०० फ्रिजवल गायी या केंद्रात आणण्यात आल्या आहेत.

टॅग्स :businessव्यवसाय